शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया : प्रतीविद्यार्थी १७ हजार रुपये प्रतिपूर्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 01:03 IST

वाशिम - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिल्यानंतर, शासनातर्फे संबंधित शाळांना शैक्षणिक शुल्काचा परतावा केला जातो. शैक्षणिक शुल्क परतावा रकमेत शासनाने एकसूत्रता आणली असून, आता प्रती विद्यार्थी १७ हजार ६७0 रुपये संबंधित शाळांना दिले जाणार आहेत.

ठळक मुद्देशाळांना मिळणार शैक्षणिक शुल्क

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम - बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिल्यानंतर, शासनातर्फे संबंधित शाळांना शैक्षणिक शुल्काचा परतावा केला जातो. शैक्षणिक शुल्क परतावा रकमेत शासनाने एकसूत्रता आणली असून, आता प्रती विद्यार्थी १७ हजार ६७0 रुपये संबंधित शाळांना दिले जाणार आहेत. शिक्षण हक्क कायद्याने (राईट टु एज्युकेशन म्हणजेच आरटीई) दिव्यांग, मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून दिले. प्राथमिक किंवा ज्या प्राथमिक शाळेला पूर्वप्राथमिक वर्ग जोडला असेल अशा शाळेच्या पहिल्या वर्गात एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिल्यानंतर शासनातर्फे संबंधित शाळांना शैक्षणिक शुल्काचा परतावा दिला जातो. शुल्क परताव्याची कमाल र्मयादेतील रक्कम निश्‍चित नसल्याने काही शाळांकडून अव्वाच्या सव्वा शुल्क दाखविले जात होते. शुल्क परतावा रकमेत एकसूत्रता आणण्यासाठी शासनाने ३0 डिसेंबर २0१७ रोजी आदेश जारी करीत, १७ हजार ६७0 रुपये इतक्या कमाल र्मयादेपर्यंत प्रती विद्यार्थी शैक्षणिक शुल्काची रक्कम निश्‍चित केली आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकार्‍यांना सूचना प्राप्त झाल्या असून, सन २0१६-१७ या वर्षासाठी १७ हजार ६७0 रुपये या रकमेच्या र्मयादेपर्यंत शैक्षणिक शुल्काचा परतावा करण्याच्या सूचनाही शासनस्तरावरून मिळालेल्या आहेत. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार ज्या शाळेमध्ये सदर बालकांना प्रवेश दिला, त्या शाळेने विद्यार्थ्यांना आकारलेले निव्वळ शैक्षणिक शुल्क अथवा शासनाने निर्धारीत केलेली कमाल र्मयादा यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढी रक्कम प्रतिपूर्तीसाठी शाळांना द्यावी, अशाही सूचना दिलेल्या आहेत. शासनाच्या सुचनांनुसार शैक्षणिक शुल्क परतावा रकमेची अंमलबजावणी वाशिम जिल्हयात केली जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना मंगळवारी दिली.

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाeducationशैक्षणिकStudentविद्यार्थी