शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

२४ तासांत वीज जोडणीचा निर्णय हवेतच विरला!

By admin | Updated: May 15, 2017 01:25 IST

ग्राहकांची गैरसोय थांबेना : अर्ज करूनही मिळत नाही ‘कनेक्शन’

लोकमत न्यूज नेटवर्कदेपूळ : नवीन वीज जोडणी घ्यायची असेल, तर किमान सहा महिने लागतात. या किचकट प्रक्रियेला फाटा देत महावितरणने २४ तासांत वीज जोडणी देण्याचा उपक्रम हाती घेतला होता. मात्र, तो हवेतच विरला असून, तांत्रिक अडचणींचे कारण समोर करून ‘कनेक्शन’ देण्यास विलंब लागत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.‘मोबाइल अ‍ॅप’ आणि ‘आॅनलाइन’ प्रक्रियेचा आधार घेत जिल्ह्यातील वाशिम आणि कारंजा येथून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली होती. यानुसार, ग्राहकांना वीज मागणी अर्ज देण्याची गरज नाही. अर्ज आॅनलाइन तथा मोबाइल अ‍ॅपद्वारे करता येणार आहेत. यामुळे ग्राहकांच्या वेळ व पैशाची बचत होणार आहे, असे महावितरणने जाहीर केले होते. २४ तासांत वीज जोडणी देण्याच्या उपक्रमास प्रायोगिक तत्त्वावर वाशिम व कारंजा शहरातून सुरुवात करण्यात आली होती. वाशिम शहरामध्ये रॉयल प्लाझा डी.पी., राणी लक्ष्मीबाई शाळा, बस स्टॅण्डजवळ, बोरा आॅइल मिल, शेळके हॉस्पिटल, बस स्टँड बुस्टर, गाभणे हॉस्पिटल, माउलीनगर, आंबेडकर चौक, न्यू अल्लाडा प्लॉट, वाशिमकर कॉम्प्लेक्स, पी.डब्ल्यू.डी. आॅफीस, न्यू गव्हाणकरनगर, व्यंकटेश कॉलनी, कलेक्टर आॅफीस, पोल्ट्री फार्म, सिव्हिल लाइन, जवाहर कॉलनी, न्यू आय.यू.डी.पी -१, न्यू आययूडीपी- २, न्यू आययूडीपी - ३, ४, मुजूमदार हाउस, दागडे हॉस्पिटल, कानडे हॉस्पिटल, तहसील आॅफीस, अल्लाडा प्लॉट, तिरुपती सिटी व नंदनवन कॉलनी, सर्किट हाउस, योजना कॉलनी, सुंदर वाटिका, ओरा हॉस्पिटल, दंडे हॉस्पिटल, बाहेती हॉस्पिटल, वाटाणेवाडी, बीसीएच होस्टेल, राधाकृष्णनगर, निकाल होस्टेल आदी ठिकाणी राहणाऱ्या ग्राहकांना २४ तासांत नवीन वीज कनेक्शन दिले जाणार होते. मात्र, मोबाइल अ‍ॅप आणि आॅनलाइनविषयी जनजागृतीच नसल्यामुळे या उपक्रमास प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. महावितरणने वीज कनेक्शनसाठी ‘मोबाइल अ‍ॅप’ आणि ‘आॅनलाइन’ प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्राहकांकडून त्यास प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. कागदोपत्री प्रक्रियेमुळे निश्चितपणे कनेक्शन द्यायला वेळ लागत आहे. ग्राहकांनी याकामी सहकार्य करायला हवे.- विजय मेश्राम, कार्यकारी अभियंता, महावितरण