शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
5
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
6
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
7
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
8
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
9
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
10
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
11
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
12
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
13
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
14
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
15
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
16
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
17
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
18
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
19
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

गोदामामधून २३ लाखांचे बियाणे लंपास

By admin | Updated: May 20, 2016 01:50 IST

औद्योगिक वसाहतीमधील घटना.

वाशिम : हिंगोली रोडवर असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या बियाणे प्रक्रिया युनिटमधून तब्बल २३ लाख रुपयांचे सोयाबीन व हरभर्‍याचे बियाणे अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना बुधवारला घडली असून, गुरुवारला रात्री उशिरा गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.
वाशिम ते हिंगोली महामार्गावरील औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वारावर महाबीजचे बीज प्रक्रिया युनिट आहे. येथे बियाण्यांवर प्रक्रिया करून साठवणूक केली जाते. बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून बांधून ठेवले. त्यानंतर गोदामामधील १८0 क्विंटल सोयाबीन व २१0 क्विंटल हरभर्‍याचे बियाणे ट्रकमध्ये भरून पसार झाले.
सदर घटना बुधवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, पोलीस उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे, पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन कांबळे, ठाणेदार विनायक जाधव यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली.
याप्रकरणी महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक नीळकंठराव पवार यांच्या फिर्यादीहून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारला रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी या घटनेतील संशयित म्हणून दोघांना अटक केली असून त्यांची नावे राजू वसंता मुळे (रा. वाशिम) व वसंता नारायण जाधव (रा. धुमका ता.जि.वाशिम) अशी आहेत. या दोघांना न्यायालयाने २३ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास वाशिम ग्रामीणचे ठाणेदार विनायक जाधव करीत आहेत.