मालेगाव नगर पंचायतला नागरी सुविधा पुरविण्याकरिता २.२५ कोटी रुपये मंजुर
By Admin | Updated: March 30, 2017 13:50 IST2017-03-30T13:50:16+5:302017-03-30T13:50:16+5:30
मानोरा नगर पंचायतला सुध्दा यापूर्वीच आमदार राजेंद्र पाटणी यांनी निधी उपलब्ध करुन दिलेला आहे.

मालेगाव नगर पंचायतला नागरी सुविधा पुरविण्याकरिता २.२५ कोटी रुपये मंजुर
वाशिम : राज्यातील नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीकोणातून आमदार राजेंद्र पाटणी यांनी मालेगाव नगर पंचायतला निधी मिळणे बाबत नगर विकास विभागाला मागणी केली होती. वाशिम जिल्हयातील नव्याने स्थापन झालेल्या मानोरा नगर पंचायतला सुध्दा यापूर्वीच आमदार राजेंद्र पाटणी यांनी निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. परंतु मालेगाव हे अत्यंत मोठे शहर असून सुध्दा या ठिकाणी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने शहरवासीयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मालेगाव करिता निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला. नुकतेच मालेगाव नगर पंचायतला नागरी सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोणातून शासनाने २.२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शहरातील रस्ते, पथदिवे, सुशोभीकरण करण्यात येवून लवकरच मालेगाव शहरालचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल.