२२ वर्षीय युवकाचे ६ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य

By Admin | Updated: June 5, 2017 19:04 IST2017-06-05T19:04:34+5:302017-06-05T19:04:34+5:30

कामरगाव (वाशिम ) : येथुून जवळच असलेल्या बेंबळा या गावी एका २२ वर्षीय तरुणाने ६ वर्षाच्या बालकाशी अनैसर्गीक कृत्य केल्याने आरोपीविरूद्ध ५ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

The 22-year-old's 6-year-old child is unconscionable | २२ वर्षीय युवकाचे ६ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य

२२ वर्षीय युवकाचे ६ वर्षीय बालकाशी अनैसर्गिक कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क
कामरगाव (वाशिम ) : येथुून जवळच असलेल्या बेंबळा या गावी एका २२ वर्षीय तरुणाने ६ वर्षाच्या बालकाशी अनैसर्गीक कृत्य केल्याने आरोपीविरूद्ध ५ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
बेंबळा येथील ६ वर्षीय चिमुकला हा आपल्या आजीच्या घरासमोर रविवारी सायंकाळी ६ वाजता दरम्यान खेळत असतांना तेथीलच युवक पवन शांताराम जवंजाळ याने बालकास उचलून जवळच्या शेतात नेले आणि त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केले. स्थानिक काही जणांनी हा प्रकार बघितल्यानंतर या प्रकाराची माहिती पिडीत बालकाच्या आईला दिली. बालकाची आई व गावातील काही युवक घटनास्थळाकडे येत असल्याचे पाहुन आरोपी पवन याने घटनास्थळावरुन पळ काढला. मनोज काळेकर यांच्या फिर्यादीवरुन भादंवी कलम ३७७ , आरडब्ल्यु. ३, ४ बाललैंगिक संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुुढील तपास ठाणेदार राहूल आठवले, पोलीस उपनिरीक्षक राहूल गुहे, जमादाार गजानन कदम, जमादार राजगुरे, टाले करीत आहेत.

Web Title: The 22-year-old's 6-year-old child is unconscionable