शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
5
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
6
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
7
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
8
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
9
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
10
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
11
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
12
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
13
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
14
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
15
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
16
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
19
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटातील मारहाणप्रकरणी २२ जणांवर गुन्हा

By admin | Updated: May 23, 2016 01:24 IST

पिंप्री खरबी येथील घटनेत दोन गंभीर जखमी.

मंगरुळपीर (जि. वाशिम): तालुक्यातील पिंप्री खरबी येथे शेतात वहिवाटीच्या रस्त्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २0 मे रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान घडली. या हाणामारीत पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले असून, परस्परविरोधी तक्रारीवरून मंगरुळपीर पोलिसांनी दोन्ही गटांतील मिळून २२ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी राहुल सुरेश ठाकरे रा. पिंप्री खरबी याने फिर्याद दिली की, सिद्धार्थ सोनोने, गौतम सोनोने, भीमराव सोनोने, देवीदास कांबळे, चंदन कांबळे, प्रल्हाद ठाकरे, राजेश ठाकरे, भानुदास ठाकरे, विठ्ठल ठाकरे यांनी शेतीचे रस्त्याचे कारणावरून गैर कायद्याची मंडळी जमवून एकत्र येऊन नमूद आरोपींतांनी फिर्यादीच्या वडिलास व मोठी आई यांना काठय़ाने व गोट्याने मारहाण करून गंभीर जखमी करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला व जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले, अशा फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. तर दुसर्‍या गटातील फिर्यादी पुरुषोत्तम ठाकरे रा. पिंप्री खरबी यांनी पोलिसात फिर्याद दिली की, रुपेश ठाकरे, संतोष ठाकरे, गुलाब ठाकरे, गजानन ठाकरे, गोपाल ठाकरे, सुरेश ठाकरे, रामधन ठाकरे, विष्णू ठाकरे, नाजूक सावके यांनी फिर्यादी हा त्याचे घरासमोर बसला असता शेतात जाण्याचे रस्त्याचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून जाण्याचे रस्त्याचे कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्याच्या सोबतच्या लोकांवर रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशा फिर्यादीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.