महिला बचतगटांना २.१३ कोटींचे कर्ज वाटप
By Admin | Updated: March 9, 2015 02:16 IST2015-03-09T02:16:51+5:302015-03-09T02:16:51+5:30
वाशिम, मालेगाव व मानोरा येथील १0६ बचतगटांचा समावेश.

महिला बचतगटांना २.१३ कोटींचे कर्ज वाटप
नंदकिशोर नारे /वाशिम: महिलांचे जीवनमान उंचवावे या उदात्त हेतूने महिला बचतगटांना विविध उद्योगासाठी नाबार्ड व स्वयंशासन बहूद्देशीय महिला विकास संस्थेच्यावतीने २ कोटी १३ लाख ५ हजार रुपयांचे कर्जवाटप ८ मार्चपर्यंंंत करण्यात आले. महिला स्वयंसाहाय्यता बचतगटाचे सक्षमीकरण करण्याकरिता राबविण्यात येत असलेल्या योजनेतून महिला बचतगटांना विविध उद्योगासाठी नाबार्ड फायनन्स व स्वयंशासन बहूदेशीय महिला विकास संस्था वाशिमच्यावतीने जिल्हय़ातील १0६ महिला बचतगटांना २ कोटी १३ लाख ५ हजार रुपये कर्जाचे वाटप एप्रिल २0१४ ते ८ मार्च २0१५ पर्यंंंत संस्था संचालक माधवराव इंगोले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यामध्ये वाशिम तालुक्यामध्ये ५५ बचतगटांना १ कोटी २0 लाख ५ हजार, मालेगाव तालुक्यातील ३४ बचतगटांना ३२ लाख ५0 हजार, तर मानोरा तालुक्यातील १७ बच तगटांना ६६ लाख ८0 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये वाशिम तालुक्यातील १२ गावांचा, मालेगाव तालुक्यातील ३ गावांचा, तर मानोरा तालुक्यातील ५ गावातील बचतगटांचा समावेश आहे. कर्ज वाटपाचा लाभ घेणार्या गावांमध्ये वाशिम येथील २९, अनसिंग येथील १0, भोयता येथील ४, सोयता येथील ३, उमरा शम. २ तर भटउमरा, काजळांबा, फाळेगाव थेट, वारला, शेलू खु, कोंडाळा झा. व ब्राह्मणवाडा येथील प्रत्येकी एका बचतगटाचा समावेश आहे. मानोरा तालुक्यामधील मानोरा येथील ५, इंझोरी येथील ३, म्हसणी येथील ४, दापुरा येथील ३, विठोली येथील २ बचतगटांचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यातील मालेगाव येथील ३0, शिरपूर व नागरतास येथील प्रत्येक एक बचतगटाचा समावेश आहे. या कर्जामुळे १0६ महिला बचतगटातील हजारो महिला सदस्यांच्या हा ताला रोजगार मिळाला आहे. जिल्हय़ातील उर्वरित तीन तालुके रिसोड, कारंजा व मंगरूळपीर येथेही कर्ज वाटप करण्यात येणार आहे. महिला बचत गटाची सर्व प्रक्रिया बचतगटांच्या आयोजित सभेत करून बचतगटांना कर्जाचे वाटप वितरित करण्यात आले. महिला बचतगटांच्या कर्जाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी संस्थेचे संचालक माधवराव इंगोले, नाबार्ड फायनान्सचे जिल्हा व्यवस्थापक उदय नानकर, प्रवीण शिंदे, अमोल चौरे, उमेश बडगुजर, नरेंद्र पवार, पंकज चव्हाण, ज्योत्सा पुरी, संस्थाअध्यक्ष कमल माधव इंगोले यांचा समावेश आहे.