शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हय़ात २१२ टपाली मते अवैध

By admin | Updated: October 22, 2014 00:37 IST

कारंजा-मानोरा मतदारसंघातील सर्वाधिक टपाल मतं अवैध.

दादाराव गायकवाड / कारंजा लाड (वाशिम) नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वाशिम जिल्हय़ातील तिन्ही मतदार संघात झालेल्या टपाली मतदानात २१२ मते अवैध ठरली आहेत. यामध्ये कारंजा-मानोरा मतदार संघ आघाडीवर असून, येथे १११ टपाली मतू अवैध ठरली आहेत. सुशिक्षीत आणि सुज्ञ मतदारांकडून झालेंली ही चूक सर्वांना आश्‍चर्यचकित करणारी आहे.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वाशिम जिल्हय़ातील वाशिम-मंगरुळपीर, रिसोड-मालेगाव आणि कारंजा-मानोरा या तिन्ही मतदार संघात मिळून २१२ टपाली मते अवैध ठरली, तर तीन टपाली मतपत्रिकावर नोटाचा उल्लेख होता. वाशिम-मंगरुळपीर मतदार संघात निवडणूक विभागाला प्राप्त झालेल्या ९0९ टपाली मतांपैकी एकूण ७२0 मते वैध ठरली, तर ८९ मते अवैध ठरली. रिसोड-मालेगाव मतदार संघात निवडणूक विभागाला प्राप्त झालेल्या ११0९ टपाली मतापैंकी एकूण १0८४ मते वैध ठरली, तर २२ मते अवैध ठरली आणि उर्वरित तीन मते ह्यनोटाह्णची होती. कारंजा-मानोरा मतदार संघाचा विचार करता या मतदार संघातील बाहेरगावी निवडणूक कामानिमित्त नियुक्त असलेल्या मतदारांना एकूण १३७६ टपाली मतपत्रिका पाठविण्यात आल्या. त्यापैकी ११३0 मतपत्रिका निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या. यामध्ये ९२३ मते वैध ठरली, तर उर्वरित १११ मते अवैध ठरली. ही बाब निश्‍चितच विचार करण्यासारखी आहे. या मतदार संघातील निवडणूक विभागाकडून जारी करण्यात आलेल्या टपाली मतपत्रिकांपैकी २४२ मतपत्रिका निवडणूक विभागाला प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवसापर्यंत प्राप्तच झाल्या नाहीत. विविध कारणांमुळे या मतपत्रिका निवडणूक विभागापर्यंत पोहोचण्यात विलंब झाल्याने त्यांना काहीच अर्थ राहिला नाही. संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांच्या धिसडघाईने टपाली मतदान अवैध ठरल्यामुळे उमेदवारांचे मात्र थोडे नुकसानच झाले आहे.