वाशिम जिल्ह्यात नव्याने आढळले २१० कोरोना बाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 12:16 IST2021-03-24T12:16:32+5:302021-03-24T12:16:50+5:30
CoronaVirus in Washim पुन्हा नव्याने २१० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.

वाशिम जिल्ह्यात नव्याने आढळले २१० कोरोना बाधित रुग्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आरोग्य विभागाकडून मंगळवारी प्राप्त अहवालानुसार, पुन्हा नव्याने २१० कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतचा एकूण आकडा १३ हजार ४१० वर पोहोचला असून मंगळवारी २०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मंगळवारी वाशिम तालुक्यातील ६६ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. रिसोड शहरातील आसनगल्ली -१, महात्मा फुले नगर -१, गैबीपुरा -१, वाघी -१, रिठद -१, केनवड -१, कुकसा -१, करडा -१, मंगरुळपीर शहरातील बिरबलनाथ मंदिर परिसरातील १, महावीर कॉलनी -१, जांब रोड परिसरातील २, सुभाष चौक परिसरातील २, अशोक नगर -२, संभाजी नगर -१, बायपास परिसरातील १, नगरपरिषद परिसरातील ८, हुडको कॉलनी -१, बस डेपो परिसरातील १, कल्याणी नगर -१, शहरातील इतर ठिकाणचे ७, शहापूर -२, कासोळा -४, चांभई -१, नवीन सोनखास -२, सोनखास -२, धोत्रा -१, शेंदूरजना मोरे -१२, वनोजा -४, पेडगाव -३, शेलूबाजार -१९, पोटी -४, गिंभा -१, सार्सी -१, गोलवाडी -१, आरक -१, सायखेडा -२, मंगळसा -१, जनुना -१, मोहरी -१, हिसई -१, मानोरा तालुक्यातील इंझोरी -१, पोहरादेवी -२, चिखली -१, सोयजना -२, मोहगव्हाण -१, मालेगाव शहरातील ४, राजुरा -१, जोडगव्हाण -१, केळी -१, सोनाळा -१, शिरपूर -१, कारंजा शहरातील निवारा कॉलनी -२, शांती नगर -१, गवळीपुरा -२, राजपुरा -१, बायपास परिसरातील १, उपजिल्हा रुग्णालय परिसरातील २, पंचायत समिती परिसरातील १, शिवाजी नगर -१, दाईपुरा -१, बंजारा कॉलनी -१, संतोषी माता कॉलनी -१, शहरातील इतर ठिकाणचे २, बेंबळा -१, लाडेगाव -१, कामरगाव -१, पारवा कोहर -१, मोहगव्हाण -१, पोहा -१, लोहगाव -१ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
जिल्ह्याबाहेरील ५ बाधितांची नोंद झाली असून २०८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १३,४१० वर पाेहोचला आहे.
(प्रतिनिधी