शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

कारंजा तालुक्यात ११ महिन्यात २१ शेतकरी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 5:44 PM

गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम): तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असून, गेल्या ११ महिन्यांत या तालुक्यातील २१ शेतकºयांनी नापिकी, कर्जबाजारीपणामुळे मृत्यूला कवटाळले आहे. अर्थात महिन्याला दोन शेतकरी आत्महत्याकारंजा तालुक्यात घडत असल्याचे स्पष्ट होत असून, या २१ शेतकरी आत्महत्यांपैकी शासकीय मदतीसाठी १० पात्र, ६ अपात्र ठरल्या, तर ५ त्रुटीच्या फेºयात अडकल्याचे प्रशासनाकडून घेतलेल्या माहितीवरुन स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून निसर्गाच्या बदलत्या चक्राचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेती करणे अवघड झाले असून, अगदी हातातोंडाशी आलेली पिकेही नैसर्गिक आपत्तीमुळे हातून जात असल्याने शेतकरी संकटात फसत चालला आहे. नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढत असतानाच घराचा डोलारा कसा सांभाळायचा, हा प्रश्न शेतकºयांना पडत आहे. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत असल्याचे दिसत आहे. त्यात एकट्या कारंजा तालुक्यात १३ जानेवारी २०१९ ते १३ नोव्हेंबर २०१९ या ११ महिन्यांच्या कालावधित २१ शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. शासनाच्या वतीने पात्र शेतकरी आत्महत्येस १ लाख रूपयांचे अनुदान दिल्या जाते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रकरण प्रशासनाकडे मंजुरीसाठी दाखल करण्यात येते. या प्रक्रियेंतर्गत कारंजा तालुक्यात ११ महिन्यात झालेल्या २१ शेतकरी आत्महत्यांपैकी आतापर्यंत केवळ १० शेतकरी आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. ६ अपात्र ठरल्या तर ५ प्रकरणे अद्यापही त्रुटींमुळे प्रशासन दरबारी पडून आहेत. कारंजा तालुक्यात ११ महिन्यांत जय शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले त्यापैकी रामकृष्ण विठ्ठल हुमने रा. धोत्रा देशमुख, अंबादास चंद्रभान कंगाले रा. भामदेवी, जगन्नाथ गोरखाजी गाडेकर रा. येवता, गजानन कमलाकर शिंदे रा शिवनगर, नारायण गोविंदराव बिल्लेवार रा. धनज बु., रामहरी नारायण उपाध्ये रा. काजळेश्वर, रविंद्र नागोराव पाडे रा. येवता, मोहम्मद वहिद मो. शफी रा. कारंजा, रविंद्र रामदास राठोड रा. महागाव व रूपराव दिनकर शिंदे रा खेर्डा खु. या शेतकºयांच्या आत्महत्या शासकीय व प्रशासकीय निकषात पात्र ठरल्या तर ज्ञानेश्वर भिका सावळे, नितीन सुरेश भोयर, किशोर रामराव राऊत, विलास बाजीराव कापसे, संतोष यशवंत लव्हाळे व देवराव सदाशिव शेळके या ६ शेतकºयांच्या आत्महत्या निकषात न बसल्याने अपात्र ठरविण्यात आल्या. गणेश उंकडा वानखडे रा. विरगव्हाण, गजानन लुंगाजी रंगे रा. वडगाव रंगे, कुसुम सुधाकर बेलखेडे रा. बेलखेड, श्रीकृष्ण रंगराव पुंड रा. दुघोरा  व अवधुत झिंगराजी इंगळे रा. खानापूर या ५ शेतकºयांच्या आत्महत्येची प्रकरणे त्रुटीमुळे प्रशासन दरबारी प्रलंबित आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाfarmer suicideशेतकरी आत्महत्या