ऑईलअभावी २०१ रोहित्र धुळखात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 12:45 PM2020-10-07T12:45:09+5:302020-10-07T12:46:50+5:30

Washim MSEDCL News सिलिकान ऑईलच उपलब्ध नसल्याने दुरुस्ती होऊनही ते शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत.

201 Transfarmers dusted due to lack of oil! | ऑईलअभावी २०१ रोहित्र धुळखात !

ऑईलअभावी २०१ रोहित्र धुळखात !

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले २०१ रोहित्र ऑईलविना गेल्या काही महिन्यांपासून धुळखात पडले आहेत. शेतकरी हे रोहित्र मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत; परंतु रोहित्रासाठी आवश्यक सिलिकान ऑईलच उपलब्ध नसल्याने दुरुस्ती होऊनही ते शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत.
शेतकºयांना सिंचनासाठी सुरळीत वीज पुरवठा व्हावा म्हणून महावितरणने जिल्ह्यातील जवळपास प्रत्येकच शिवारात कृषी फिडरवर रोहित्र बसविले आहेत. तथापि, यातील शेकडो रोहित्र नादुरुस्त असल्याने शेतकºयांना सुरळीत वीज पुरवठाच होऊ शकत नाही. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाभरात नादुरुस्त झालेले २०१ रोहित्र महावितरणने दुरुस्तीसाठी शेतकºयांच्या शेतातून काढून आणले. त्याबाबतचा अहवालही वरिष्ठस्तरावर पाठविण्यात आला आणि रोहित्रांची दुरुस्तीही करण्यात आल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता आर. जे. तायडे यांनी दिली आहे. तथापि, या रोहित्रात टाकण्यासाठी आवश्यक आॅईलच उपलब्ध नसल्याने ते दुरुस्त होऊनही शेतकºयांच्या शेतात बसविल्या गेले नाहीत. त्यात १०० केव्हीएचे ५०, ६३ केव्हीएचे ४५, तर १०६ एसयूडीएस (लहान रोहित्र) रोहित्रांचा समावेश आहे. यामुळे खरीपातील कापूस पिकासह ऊस, पपई, केळी, हळद ही बहुविध पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. शिवाय यंदाचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.

रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करण्यात आले आहेत. या रोहित्रांसाठी २५ हजार लिटर आॅईलची मागणी वरिष्ठस्तरावर केली आहे; परंतु ऑईल उपलब्ध नसल्याने ते लावता येत नाहीत. दोन चार दिवसांत आॅईल उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
-आर. जे. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण वाशिम

आमच्या शिवारातील रोहित्र २ महिन्यांपूर्वी नादुरुस्त झाले. त्यामुळे कापूस, ऊस, हळद, आदी पिके धोक्यात आली आहेत. तसेच मुबलक पाणी असतानाही रोहित्राअभावी रब्बी हंगामाची पेरणी अशक्य आहे.
-लक्ष्मण इंगळे,
शेतकरी, उमरा (शम), ता. वाशिम

 

Web Title: 201 Transfarmers dusted due to lack of oil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम