शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयातच २० व्हेंटिलेटर पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST

जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत १६६९९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १३८५२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तर १८८ जणांचा मृत्यू झाला ...

जिल्ह्यात २ एप्रिलपर्यंत १६६९९ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी १३८५२ व्यक्तींनी कोरोनावर मात केली, तर १८८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २६५८ व्यक्ती अ‍ॅक्टीव्ह आहेत. जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे आरोग्य विभागही त्रस्त झाला आहे. त्यात वृद्धांना कोरोना संसर्गाची लागण झाल्यानंतर त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल केले जात नाही. त्यामुळे त्यांची स्थिती गंभीर होऊन मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. एखादवेळी गरज पडल्यास त्यांना व्हेंटीलेटरवरही ठेवले जाते. यासाठी जिल्हास्तर कोविड केअर सेंटरमध्ये २७, तर वाशिम शहरातील खासगी कोविड सेंटरमध्ये ९ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सद्यस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ ७ व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहेत.

----------------

एकूण व्हेंटीलेटर - ३६

जिल्ह्यात उपचार सुरू असलेले रुग्ण-

जिल्हा रुग्णालयात दाखल गंभीर रुग्ण -१२

जिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर -२७

-----------------

जिल्हा रुग्णालयात २० व्हेंटिलेटर शिल्लक

जिल्हा रुग्णालयात कोरोना बाधित गंभीर व्यक्तींच्या उपचारात क ोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आरोग्य विभागाने २७ व्हेंटिलेटर उपलब्ध केले आहेत. त्यापैकी ७ व्हेंटिलेटरवर रुग्ण असून, इतर २० व्हेंटिलेटर पडून आहेत. खासगी कोविड के अर सेंटरमध्येही ९ व्हेंटिलेटर उपलब्ध असून, यातील एकही व्हेंटिलेटर सध्या वापरात नाही. प्रत्यक्षात गंभीर रुग्णांची संख्या कमी असल्याने व्हेंटिलेटरचा वापरच केला जात नसल्याचे दिसत आहे.

-----------------

आवश्यतेनुसार मिळते व्हेंटिलेटर

-जिल्ह्यात खासगी कोविड सेंटर आणि जिल्हा रुग्णालयात मिळून पुरेसे व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यात गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत नाही.

.-जिल्हा रुग्णालयात २० व्हेंटिलेटर शिल्लक असून, कोणत्याही सेंटरमध्ये एखादवेळी रुग्ण वाढल्यास त्यांना तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे कोणतीही अडचण जाणवत नाही.

- जिल्हा रुग्णालयात दाखल प्रत्येक गंभीर रुग्णाला अनेकदा व्हेंटिलेटरची गरजही पडत नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटरचा वापर करण्याची आवश्यकताही भासत नाही.

---------

कोट: कोणत्याही कोविड सेंटरला व्हेंटिलेटरचा तूटवडा जाणवत नाही. प्रत्येक सेंटरला पुरेसे व्हेंटिरलेटर उपलब्ध आहेत. गंभीर रुग्णांची संख्याही तुलनेत खूप कमी आहे. जिल्ह्यात ३६ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. त्यापैकी केवळ ७ व्हेंटिलेटरचा वापर होत आहे.

-डॉ. मधुकर राठोड,

जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

----------------------