२० हजार चालकांनी काढला वाहन परवाना !
By Admin | Updated: April 17, 2017 16:30 IST2017-04-17T16:30:47+5:302017-04-17T16:30:47+5:30
सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून २० हजार ५६८ चालकांनी वाहन चालक परवाना काढला आहे.

२० हजार चालकांनी काढला वाहन परवाना !
वाशिम - सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून २० हजार ५६८ चालकांनी वाहन चालक परवाना काढला आहे.
वाहतुकीच्या नियमांचा एक भाग म्हणून वाहन चालविण्यासाठी चालकाला वाहन चालक परवाना बंधनकारक आहे. वाहन चालक परवाना काढण्यासाठी चालकाला आॅनलाईन परीक्षा व वाहन चालक चाचणी उत्तीर्ण केल्यानंतर परवाना दिला जातो. एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत वाशिम उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे २० हजार ५६८ जणांनी या दोन्ही चाचण्या उत्तीर्ण केल्याने त्यांना वाहन चालक परवाना देण्यात आला. ३३३७ जणांना नवीन वाहक परवाना (कंडक्टर लायसन्स) देण्यात आले. तसेच सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात वाशिम जिल्ह्यात एकूण १८ हजार २३० नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यात १५ हजार ३८१ दुचाकी, ९७४ चारचाकी (कार व जीप), १ आॅटोरिक्षा, ५१ ट्रक, ३५६ डिलीव्हरी व्हॅन, १४४५ ट्रॅक्टर-ट्रेलर, २२ प्रवासी वाहनांचा समावेश आहे.