मंगरुळपीर तालुक्यात पाच दिवसांत २० बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:59+5:302021-02-05T09:25:59+5:30
---------------- महामार्गालगत नालीचे काम वाशिम : वाशिम-कारंजादरम्यान १६१- ए या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगात करण्यात येत आहे. आता शहरांतील ...

मंगरुळपीर तालुक्यात पाच दिवसांत २० बाधित
----------------
महामार्गालगत नालीचे काम
वाशिम : वाशिम-कारंजादरम्यान १६१- ए या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगात करण्यात येत आहे. आता शहरांतील महामार्गाचे काम पूर्णत्वास येत असल्याने या मार्गालगत नाल्यांचे काम करण्यात येत आहे. मंगरुळपीर आणि कारंजा शहरात या कामाला वेग आल्याचे चित्र सोमवार १ फेब्रुवारी रोजी दिसून आले. या कामामुळे वाहतुकीला मात्र थोडा अडथळा येत आहे.
----------------
समृद्ध गाव अंतर्गत सेंद्रिय खत निर्मिती
वाशिम : जिल्ह्यातील ४३ गावांत समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासह पर्यावरण वृद्धी करण्यावरही भरही दिला जात आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीवर भर देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून, यासाठी सेंद्रिय खत निर्मितीचे प्रशिक्षणही दिले जात आहे. जानोरी या गावात कंपोस्ट खत निर्मितीही सुरू करण्यात आली आहे.
===Photopath===
010221\01wsm_3_01022021_35.jpg
===Caption===
समृद्ध गाव अंतर्गत सेंद्रीय खत निर्मिती