मंगरुळपीर तालुक्यात आणखी २ बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:07+5:302021-01-13T05:45:07+5:30
----------- चौकात गतीरोधकाचा अभाव आसेगाव: वाशिम-मंगरुळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता या मार्गावर वाहने सुसाट वेगाने धावत ...

मंगरुळपीर तालुक्यात आणखी २ बाधित
-----------
चौकात गतीरोधकाचा अभाव
आसेगाव: वाशिम-मंगरुळपीरदरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. आता या मार्गावर वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. अशात गावांच्या ठिकाणी गतीरोधक बसविण्यात येत असले तरी, धानोरा खु. येथे आसेगाव, शेंदुरजनाकडून येणाऱ्या मार्गावर गतीरोधक बसविण्यात आले नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची भीती आहे.
--------------------
एअर व्हॉल्वमधून पाण्याचा अपव्यय
कारंजा : येथील अडाण प्रकल्पातून परिसरात शहरात पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठा योजनेंतर्गतच्या व्हॉल्वला पिंप्री फॉरेस्ट गावादरम्यान गळती लागल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
-----------
रानडुकरांकडून हरभरा पिकाचे नुकसान
कामरगाव : परिसरात सध्या रब्बी पिके डौलदार आहेत; परंतु हरिण, माकड आदी वन्यप्राणी पिकांत धुमाकूळ घालत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. त्यात रविवारी रानडुकरांनी धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याच्या अर्धा एकर क्षेत्रातील हरभरा पिकाचे नुकसान केले. या नुकसानापोटी वनविभागाने भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्याने सोमवारी केली.
------
आरोग्य केंद्र परिसराची दुर्दशा
दापुरा : मानोरा तालुक्यातील कुपटा आरोग्य केंद्राअंतर्गत येत असलेल्या दापुरा आरोग्य उपकेंद्र व अॅलोपॅथी दवाखाना परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे साप, विंचू यासारख्या सरपटणाऱ्या धोकादायक जीवांचा संचार वाढला असून, डासांचा प्रादुर्भावही वाढल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका आहे.