१८ हजार मतदार वाढले
By Admin | Updated: July 24, 2014 23:05 IST2014-07-24T23:05:17+5:302014-07-24T23:05:17+5:30
जिल्ह्याची मतदार संख्या ८ लाख ९८ हजार एवढी झाली आहे.

१८ हजार मतदार वाढले
वाशिम : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत वाशिम जिल्ह्यात ८ लाख ८१ हजार ३६ एवढी मतदार संख्या होती. मागील दोन महिण्यात नव्याने १७ हजार ६२८ नविन मतदारांनी नाव नोंदणी केल्याने आता जिल्ह्याची मतदार संख्या ८ लाख ९८ हजार एवढी झाली आहे.
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुनर्रिक्षणणाचा कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात ९ ते ३0 जून दरम्यान मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची विशेष मोहिम राबविली. यादरम्यानवाशिम जिल्ह्यातील १८ हजार ३१३ नविन मतदारांनी आपले नावे मतदार यादीत नोंदविली. त्यापैकी १७६२८ मतदारांची नावे नव्याने मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे येणार्या विधानसभा निवडणूकीत १७ हजार ६२८ मतदारांची वाढ झाली. मतदार नोंदणी कार्यक्रमात १८ वर्ष पूर्ण झालेल्या मतदार यादीत नावे नसलेल्या, नावांत व तपशिलात दुरूस्ती, नावे वगळणी इ. बाबीवर या मोहीमेंतर्गंत नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली. मतदारांच्या यादीची अंतीम प्रसिध्द ३१ जुलै २0१४ रोजी करण्यात येणार असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी यांनी विशेष संक्षिप्त पूनरिक्षण कार्यक्रमांतर्गंत वाशिम जिल्हयामध्ये महिला मतदार व युवा मतदारांचे संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्ल्याबाबत समाधान व्यक्त केले आहे.
तसेच निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गंत महिला मतदार व १८ ते १९ या वयोगटातील मतदारांचे प्रमाण वाढविण्याकरीता पात्र मतदारांना निरंतर प्रक्रियेअंतर्गत मतदार नोंदणी करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.