शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात अडकलेले १७२७ नागरिक परतले स्वगृही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:55 IST

केंद्र आणि राज्यशासनाच्या निर्देशानंतर यातील १७२७ नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विविध राज्यातील ५१७१ कामगारवाशिम जिल्ह्यात अडकून पडले होते. केंद्र आणि राज्यशासनाच्या निर्देशानंतर यातील १७२७ नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केली, तर कामगार विभागाचेही सहकार्य लाभले.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्रशासनाने ‘लॉकडाऊन’, तर राज्यशासनाने सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे पोटापाण्यासाठी आलेले २० राज्यातील, तसेच परजिल्ह्यातील नागरिक वाशिम जिल्ह्यात अडकून पडले होते. प्रशासनाकडून अशा ५१७१ कामगारांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानंतर यातील ३४२ नागरिकांना शासन आणि प्रशासनाकडून ३१ ठिकाणी सुरू केलेल्या निवारा केंद्रात ठेवण्यात आले. दरम्यान, लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पाठविण्यासाठी व्यवस्था करण्याच्या सुचना केंद्र आणि राज्यशासनाकडून देण्यात आल्या आणि त्यासाठी गावी परतण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यासह त्यांना पासेस उपलब्ध करण्याच्याही सुचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्हाप्रशासनाने गावी परतण्यास इच्छूक असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करून घेतली. त्यानंतर शासकीय कॅम्पमधील ३४२ नागरिक मिळून इतर ठिकाणी असलेल्या १७२७ नागरिकांना परत त्यांच्या गावी पाठविण्यात आले आहे.तीन हजारांवर कामगार कंत्राटदारांच्या आश्रयातवाशिम जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी विविध राज्यातील हजारो कामगार आले आहेत. कोरोना विषाणूवर संसर्गासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपूर्वी आणि नंतरही त्यातील हजारो कामगार आपापल्या राज्यात स्वगृही परतले असून, त्यात प्रशासनाच्या परवानगीने परतलेल्या १७२७ कामगारांचा समावेश असला तरी अद्यापही परराज्यातील ३४४४ कामगार जिल्ह्यात कायम असून, हे सर्व कामगार कंत्राटदार कंपनीच्या तळावर आश्रयास आहेत.

 

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार