पांगराबंदी येथे १७ रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:41 IST2021-05-23T04:41:21+5:302021-05-23T04:41:21+5:30

००० बोगस डॉक्टर शोधमोहिम थंडावली वाशिम : मध्यंतरी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात बोगस ...

17 patients were found at Pangrabandi | पांगराबंदी येथे १७ रुग्ण आढळले

पांगराबंदी येथे १७ रुग्ण आढळले

०००

बोगस डॉक्टर शोधमोहिम थंडावली

वाशिम : मध्यंतरी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. मात्र, ही मोहीम सर्वच स्तरावर थंडावल्याचे दिसून येत आहे.

०००

वळणमार्गाचे काम संथगतीने

वाशिम : राष्ट्रीय महामार्ग छेदून गेलेल्या वाशिममध्ये अकोला नाका, पुसद नाका, हिंगोली नाका या मुख्य चौकांमधूनच जड वाहने धावत आहेत. वळणमार्ग अद्याप निर्माण झाला नाही. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडत आहेत.

००००००००

मास्कचा वापर नाही; ३२ जणांवर कारवाई

वाशिम : दुचाकीवर असताना मास्कचा वापर न करणाऱ्या ३२ जणांवर शहर वाहतूक शाखेच्या पथकाने शनिवारी दंडात्मक कारवाई केली आहे. यापुढेही कारवाईची मोहीम सुरू राहणार आहे.

Web Title: 17 patients were found at Pangrabandi