गुड मॉर्निग पथकाने १७ जणांना केले पोलिसांच्या स्वाधीन
By Admin | Updated: July 12, 2017 20:22 IST2017-07-12T20:22:19+5:302017-07-12T20:22:19+5:30
शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील शिरपुर जैन येथे गुडमॉर्निग पथकाने उघडयावर शौचास जाणाऱ्या १७ जणांना १२ जुलै रोजी पकडून ा पोलिसांच्या ताब्यात दिले.

गुड मॉर्निग पथकाने १७ जणांना केले पोलिसांच्या स्वाधीन
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : मालेगाव तालुक्यातील शिरपुर जैन येथे गुडमॉर्निग पथकाने उघडयावर शौचास जाणाऱ्या १७ जणांना १२ जुलै रोजी पकडून ा पोलिसांच्या ताब्यात दिले. या पथकने शिरपूर जैन सह चिवरा व ब्राम्हणवाडा येथे मोहीम राबवून एकुण ५२ जणांना उघड्यावर शौचास बसले असता पकडण्यात आले. नव्याने रुजू झालेले जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. ईस्कापे यांच्या नेतृत्वात गुडमॉर्निंग पथकाने पहाटे ५ वाजता शिरपूर जैन येथे पोहोचुन उघड्यावर शौचाला जाणाऱ्या शिरपूर जैन येथील ५२ नागरिकावर कारवाई केली.