४९ धोकादायक इमारतीत १६० रहिवासी; मरण्याची हौस नाही, पण..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:28 IST2021-06-05T04:28:46+5:302021-06-05T04:28:46+5:30
वाशिम शहरातील बालाजी मंदिरामागील भाग, देवपेठसह गावठाण भागात असलेल्या ४९ धाेकादायक ईमारती असून याबाबत नगर परिषद प्रशासनाने या ईमारतीत ...

४९ धोकादायक इमारतीत १६० रहिवासी; मरण्याची हौस नाही, पण..?
वाशिम शहरातील बालाजी मंदिरामागील भाग, देवपेठसह गावठाण भागात असलेल्या ४९ धाेकादायक ईमारती असून याबाबत नगर परिषद प्रशासनाने या ईमारतीत राहणाऱ्यांना नाेटीस देऊन दुरुस्ती करण्याच्या नाेटीस बजावल्या आहेत. धाेकादायक ईमारतीत राहणारे बहुतांश नागरिक व्यवसाय, माेलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असल्याने घराची दुरुस्ती करणे त्यांच्याकडून शक्य नसल्याचे सांगण्यात आले. प्रशासनातर्फे सर्व्हे करून त्यांना घरकूल मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
.....................
वारंवार दिल्या नोटिसा
वाशिम शहरात माेडकळीस आलेल्या ४९ जणांना नगर परिषदेतर्फे नाेटीस देण्यात आल्या आहेत. यापेैकी ६ ते ७ जण ईमारतीत राहत नाहीत. ईतरांना नाेटीस देऊन घराच्या पडक्या भागाची, धाेकादायक भागाची डागडुजी करण्याचे सांगण्यात आले असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आहे.
..................
इमारत पडल्यास जबाबदार कोण?
माेडकळीस आलेल्या ईमारतींची डागडुजी करून घेण्यासंदर्भात नगर परिषदेतर्फे घरात राहणाऱ्या कुटुंबीयांना सांगण्यात आले आहे. पावसाळ्यात किंवा ईतर वेळी ईमारत काेसळल्यास घरमालक जबाबदार राहणार असल्याचे नगर परिषदेकडून कळविण्यात आले आहे.
.................
सारे काही कळते, पण कुठे जाणार?
वडिलाेपार्जित ईमारत असून यामध्ये आम्ही ६ जण राहताे. कुटुंब चालविण्यासाठी एकीकडे लढत आहे, अशावेळी घराचे बांधकाम करणे शक्य नाही.
- श्याम घुले, वाशिम
.............
ईमारत माेडकळीस आली आहे. घरात तिघे जण राहताे. घर बांधण्याची इच्छा पण आहे. परंतु काेराेनाचा कहरात जगणे कठीण आहे. अशावेळी घर बांधता येत नाही.
- गाेविंदा घुले, वाशिम
...................
शहरात माेडकळीस आलेले, धाेकादायक असलेल्या ईमारतींचा सर्व्हे करण्यात आला आहे. वाशिम शहरामध्ये गावठाण भाग, देवपेठ भाग व बालाजी मंदिरामागे एकूण ४९ धाेकादायक इमारती आहेत.
- अविनाश देशमुख, रचना सहाय्यक, वाशिम नगर परिषद