शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील १५६० घरकुल लाभार्थिंना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 12:21 IST

Washim News १५६० लाभार्थिंना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

वाशिम : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (ग्रामीण) सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्यातील २०३३ पैकी ४७३ लाभार्थिंना अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला असून, उर्वरित १५६० लाभार्थिंना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र लाभार्थिंना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) राबविण्यात येते. घरकुल बांधकामासाठी लाभार्थिंना तीन  हप्त्यांमध्ये १.२० लाख रुपये दिले जातात. सन २०१९-२० या वर्षात जिल्हयात १४०७ तर सन २०२०-२१ या वर्षात जिल्हयात २०३३ घरकुलांना मंजुरी मिळाली. २०१९-२० मध्ये १३२३ लाभार्थिंना अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला तर ८४ जणांना पहिला हप्ताही मिळाला नाही. २०२०-२१ मध्ये ४७३  लाभार्थिंना पहिला हप्ता मिळाला तर १५६० जणांना पहिला हप्ता मिळाला नाही. अनेकांना पहिला हप्ता दिल्यानंतर पुढचे पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे पडके घर तोडून पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांच्या डोक्यावरचे छप्पर गेले आहे. पुढील हप्त्याचे पैसे मिळाले नसल्याने घराचे काम अर्धवट अवस्थेत आहे. या लाभार्थिंना गैरसोयींना सामाेरे जावे लागत आहे.

 

घरकुल योजनेंतर्गत अनुदानाचा दुसरा हप्ता मिळालेला नाही. उसनवारी करून घरकुलाचे बांधकाम केले. अनुदानाचे उर्वरित हप्ते मिळाले तर घरकुलाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करता येईल. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे.-राजेंद्र वानखडे,घरकुल लाभार्थी.

शासनाच्या विविध योजनांतून पात्र लाभार्थिंना घरकुल योजनेचा लाभ दिला जातो. ही बाब अतिशय चांगली आहे. परंतु, अनुदान वेळेवर व नियमित मिळत नसल्याने लाभार्थिंना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंचायत समिती कार्यालयात चकरा मारूनही लवकर न्याय मिळत नाही. अनुदान लवकर मिळाले तर घरकुलाचे बांधकामही वेळेवर होऊ शकते.- सीताराम पवार,घरकुल लाभार्थी.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना