शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ सधन सिंचन योजनेचा १५ हजार शेतक-यांनी घेतला लाभ

By admin | Updated: February 19, 2015 01:55 IST

सिंचनात वाढ; रिसोड तालुक्यातील सर्वाधिक शेतक-यांचा लाभ.

वाशिम : शासनाच्या कृषी विभागामार्फत विदर्भासाठी राबविण्यात येत असलेल्या विदर्भ सधन सिंचन योजनेमुळे वाशिम जिल्हय़ातील सिंचन क्षेत्रात तिप्पट वाढ झाली असून, आजवर या योजनेचा जिल्हय़ातील १५ हजार ७९७ शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने, तसेच उपलब्ध पाण्याचा सिंचनासाठी प्रभावी वापर करता यावा या उद्देशाने शासनाकडून विविध योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात विदर्भ प्रदेशासाठी २0१२-१३ पासून विदर्भ सधन सिंचन विकास योजना हा विशेष कार्यक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असून, यामध्ये विदर्भातील ८ जिल्हय़ांत ही योजना राबविण्यात येत आहे. सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या सुक्ष्म सिंचन मोहिमेंतर्गत विदर्भ सधन सिंचन विकास योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शेतकर्‍यांना मागणीप्रमाणे तुषार किंवा ठिबक सिंचनासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. शेतकर्‍याला जास्तीतजास्त दोन हेक्टरपर्यंंत या योजनेंतर्गत अनुदान देण्यात येते. या योजनेत अल्प व अत्यल्प भुधारक शेतकर्‍यांना एकूण खर्चाच्या ७५ टक्के व दोन हेक्टरपेक्षा अधिक शेती असणार्‍यांना ५0 टक्के अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाते. उर्वरित रक्कम ही शेतकर्‍याला स्वत: खर्च करावी लागते. या योजनेमुळे जिल्हय़ातील सिंचन क्षेत्रात तिप्पट वाढ झाली आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी शेतकर्‍यांना कृषी विभागाच्या कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतात. यामध्ये जिल्हय़ातील मंगरुळपीर येथील ३00१, कारंजा येथील २२६९, मानोरा येथील १३७९, रिसोड येथील ३५२९, मालेगाव येथील २७३७, तर वाशिम येथील २८८२ शेतकर्‍यांना याचा लाभ देण्यात आला. विदर्भ सधन सिंचन योजनेंतर्गत जिल्हय़ात ठिबक आणि तुषार या दोन्ही पद्धतीच्या आधारे सिंचन करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढत असून, जिल्हय़ात फळ लागवडीतही वाढ झाल्याचे दिसत आहे. विदर्भ सधन सिंचन योजनेंतर्गत जिल्हय़ाकरीता २0१२-१३ व २0१३-१४ या वर्षांसाठी एकूण १५ कोटी ७१ लाख १६ हजारांचा निधी कृषी विभागाकडे उपलब्ध करून देण्यात आला. त्यापैकी १४ कोटी २६ लाख १६ हजार रुपये शेतकर्‍यांसाठी खर्च करण्यात आले, तर एक कोटी ४५ लाख रुपयांचा निधी अद्याप कृषी विद्यापीठाकडे शिल्लक आहे. जिल्हय़ातील या योजनेंतर्गत समाविष्ट एकूण १७ हजार ६१२ लाभार्थी शेतकर्‍यांपैकी आजवर एकूण १५ हजार ७९७ शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.