शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१२० गावे ‘वॉटर न्यूट्रल’!

By admin | Updated: May 15, 2017 01:32 IST

‘जलयुक्त शिवार’ची फलनिष्पत्ती : जलसंधारणाच्या कामांना गती

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये २०० आणि २०१६-१७ मध्ये १४९ अशा ३४९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली. त्याची फलनिष्पत्ती म्हणून २०१६-१७ मध्ये १५१; तर चालूवर्षी जवळपास १२० गावांची पाण्याची गरज पूर्ण झाल्याने या गावांचा ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये समावेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दर दोन वर्षांनी उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सन २०१५-१६ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. अभियानाच्या पहिल्या दोन वर्षांत ३४९ गावांमध्ये याअंतर्गत विविध कामे पूर्ण करण्यात आली. त्यात नाला सरळीकरण, खोलीकरण, रुंदीकरण, पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंट नालाबांधाचे खोलीकरण, जुन्या जलसंरचनांचे पुनरुज्जीवन, कोल्हापुरी पद्धतीच्या व साठवण बंधाऱ्यांची दुरुस्ती, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे, पाझर, गाव, साठवण, शिवकालीन, ब्रिटिशकालीन आणि निजामकालीन तलावातील माती व नालाबांधातील गाळ काढणे, मध्यम प्रकल्पांच्या सिंचन क्षमतेनुसार प्रत्यक्ष वापर होण्यासाठी उपाययोजना करणे, छोटे ओढे, नाले जोड प्रकल्प राबविणे, विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत तसेच पाणी वापर संस्थाचे बळकटीकरण, आदी कामे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. जलसंधारणाच्या या कामांचा सकारात्मक परिणाम झाला असून, गतवर्षी १५१ गावांची पाण्याची गरज पूर्ण करण्यात प्रशासनाला यश मिळाले; तर यंदा हा आकडा १२० गावांपेक्षा अधिक होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. २०१७-१८ या वर्षांत पुन्हा १२० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची विविध कामे प्रस्तावित करण्यात आली असून, निधी प्राप्त होताच ही कामे सुरू केली जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. पाण्याची गरज पूर्ण झाल्यास गावाचा ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये होतो समावेशशेती प्रयोजनाकरिता लागणाऱ्या पाण्यासह जनावरे, गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता जलयुक्त शिवार अभियानातून गावागावांत जलसंधारणाची कामे केली जात आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून सर्वेक्षण करण्यात येऊन पाण्याची गरज पूर्ण झाल्याची शहानिशा केली जाते. त्यानंतरच संबंधित गावाचा ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये समावेश केला जातो. ज्यावर्षी ‘वॉटर न्यूट्रल’मध्ये समावेश झाला, त्यावर्षी गावात जलसंधारणाच्या कुठल्याच कामाला मंजुरी दिली जात नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.सन २०१५-१६ मध्ये जिल्ह्यातील २०० गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले. या गावांमध्ये जलसंधारणाची ४ हजार ९०६ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे ३० हजार ५३३ टीसीएम पाणीसाठा साठवण क्षमता निर्माण झाली आहे. तसेच सन २०१६-१७ मध्ये १४९ गावांमध्ये आतापर्यंत ११०० पेक्षा अधिक कामे पूर्ण झाली असून, यामुळे ७ हजार ३३४ टीसीएम पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. जुन्या कामांपैकी १७९ कामे प्रगतीपथावर असून, ही कामेही लवकरच पूर्ण होतील.- राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, वाशिम