जिल्ह्यात आणखी १२ पाॅझिटिव्ह; ११ कोरोनामुक्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST2021-01-17T04:35:32+5:302021-01-17T04:35:32+5:30

जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. शनिवारी १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील ...

12 more positives in the district; 11 Corona Free! | जिल्ह्यात आणखी १२ पाॅझिटिव्ह; ११ कोरोनामुक्त !

जिल्ह्यात आणखी १२ पाॅझिटिव्ह; ११ कोरोनामुक्त !

जानेवारी महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार दिसून येत आहे. शनिवारी १२ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला. यामध्ये वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, जैन कॉलनी येथील १, वाळकी येथील १, कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथील २, मानोरा तालुक्यातील विठोली येथील १, कुपटा येथील १, इंझोरी येथील १, मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील १, तिवळी येथील १, मंगरूळपीर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६,८७२ वर पोहोचला आहे. शनिवारी ११ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागातर्फे गावोगावी शिबिरे घेऊन संदिग्ध नागरिकांची कोरोना चाचणी करण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाचा आलेख खाली येत असला, तरी धोका अजून पूर्णपणे संपलेला नसल्याने नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)

००

१३५ जणांवर उपचार

जिल्ह्यात आतापर्यंत ६,८७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६,५८४ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय, तालुकास्तरीय कोविड केअर सेंटर आणि खासगी कोविड रुग्णालये, गृह विलगीकरणात मिळून १३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

Web Title: 12 more positives in the district; 11 Corona Free!