मालेगाव शहरात ११ रुग्ण आढळले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:30 IST2021-05-28T04:30:11+5:302021-05-28T04:30:11+5:30
०००० महाबीज बियाण्यांचा तुटवडा कायम वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असतानाही बाजारात महाबीजचे सोयाबीन बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध ...

मालेगाव शहरात ११ रुग्ण आढळले !
००००
महाबीज बियाण्यांचा तुटवडा कायम
वाशिम : खरीप हंगाम जवळ येत असतानाही बाजारात महाबीजचे सोयाबीन बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडत असल्याचे गुरुवारी वाशिम शहरात दिसून आले. महाबीजचे सोयाबीन बियाणे उपलब्ध करण्याची मागणी शेतकऱ्यांनी गुरुवारी केली.
००००
एका कोविड रुग्णालयाला मंजुरी
वाशिम : कोरोनाबाधितांवर वेळीच योग्य उपचार व्हावे याकरिता कारंजा येथील एका खासगी कोविड रुग्णालयाला जिल्हा प्रशासनाकडून २७ मे रोजी मंजुरी मिळाली आहे. यामुळे कारंजा परिसरातील रुग्णांची वाशिम, अकोला, अमरावती वारी टळणार आहे.
०००
रिठद परिसरात आरोग्य तपासणी मोहीम
वाशिम : रिसोड तालुक्यातील रिठद परिसरात कोरोनाबाधित आढळून येत असल्याने आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. गुरुवार, १७ मे रोजीदेखील रिठद, पार्डी तिखे, चिखली, किनखेडा येथे प्रत्येकी एका जणाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला.