शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

वाशिम जिल्ह्यात आणखी ११ कोरोनाबाधित; रुग्णसंख्या १४१ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 5:36 PM

११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता एकूण रुग्णसंख्या १४१ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ७ जुलै रोजी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आणखी ११ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता एकूण रुग्णसंख्या १४१ झाली आहे. यापैकी ४२ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. जिल्ह्यात मे महिन्यापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. जून महिन्यापासून वाढत असलेली रुग्णसंख्या जुलै महिन्यातही वाढतच असल्याचे प्राप्त अहवालावरून दिसून येते. ७ जुलै रोजी दुपारी ४ वाजतादरम्यान २६ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून यापैकी १५ अहवाल निगेटिव्ह आहेत. उर्वरित ११ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये वाशिम शहरातील ९ व मंगरूळपीरमधील २ व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण यापूर्वीच्या बाधितांच्या संपर्कातील आहेत. वाशिम शहरातील गवळीपुरा परिसरातील १८ वर्षीय युवक, ११ वर्षीय मुलगा, २०, ३० व ३८ वर्षीय महिला, १४ व १६ वर्षीय युवती, तसेच गंगू प्लॉट परिसरातील ३५ व ४४ वर्षीय व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंगरूळपीर येथील संभाजी नगर परिसरातील ३४ वर्षीय व्यक्ती व मदार तकिया, माळीपुरा परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.आता एकूण कोरोनाबाधित रुग्णसंख्या १४१ झाली असून, यामध्ये ४२ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. १४१ रुग्णांमध्ये जिल्ह्यातील १२६, तर वाशिम जिल्ह्यातील रहिवासी; परंतु परजिल्ह्यात उपचार घेणाºया १५ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात ३३ तर जिल्ह्याबाहेर नऊ अशा एकूण ४२ जणांवर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या