१०.६८ कोटींचे पिककर्ज वाटप
By Admin | Updated: May 31, 2017 19:49 IST2017-05-31T19:49:01+5:302017-05-31T19:49:01+5:30
शिरपूरजैन : येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शाखेतून सेवा सहकारी सोसायटी मार्फत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना १०.६७ कोटींचे पिक कर्ज वाटपा करण्यात आले.

१०.६८ कोटींचे पिककर्ज वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूरजैन : येथील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शाखेतून सेवा सहकारी सोसायटी मार्फत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना १०.६७ कोटींचे पिक कर्ज वाटपा करण्यात आले. शिरपूर परिसरातील ५० टक्के शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केला व सेवा सहकारी सोसायटी मार्फत पुन्हा पिक कर्जाची मागणी केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिरपूर शाखे १५६४ शेतकऱ्यांना २९ मे पर्यंत १०.६८ कोटी रुपयांचे पिक कर्ज वाटप केले असे शाखाधिकारी भागवत जाधव निरीक्षक गायकवाड यांनी कळविले.