ग्रामसेवकाच्या भोंगळ कारभारामुळे १०६ कुटुंब घरकुल योजनेतून अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:41 IST2021-07-31T04:41:04+5:302021-07-31T04:41:04+5:30

भिवरी, आंबोडा, नागलवाडी येथील ११९ कुटुंबीयांची यादी पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्यात येत होती. परंतु ग्रामसेवक सतीश आर. मांजरे ...

106 families disqualified from Gharkul Yojana due to mismanagement of Gram Sevak | ग्रामसेवकाच्या भोंगळ कारभारामुळे १०६ कुटुंब घरकुल योजनेतून अपात्र

ग्रामसेवकाच्या भोंगळ कारभारामुळे १०६ कुटुंब घरकुल योजनेतून अपात्र

भिवरी, आंबोडा, नागलवाडी येथील ११९ कुटुंबीयांची यादी पंतप्रधान आवास योजनेत समाविष्ट करण्यात येत होती. परंतु ग्रामसेवक सतीश आर. मांजरे यांच्या भोंगळ कारभारामुळे फक्त १३ कुटुंबीय या योजनेसाठी पात्र ठरली आहेत. चुकीच्या सर्वेक्षणामुळे १०६ कुटुंब अपात्र घोषित करण्यात आली आहेत. पात्र कुटुंबीयांची माहिती चुकीची देण्यात आल्याने ती कुटुंब अपात्र घोषित करण्यात आली आहेत. याबाबत ग्रामसेवक सतीश मांजरे व संबधितांवर कारवाई करून अपात्र घोषित करण्यात आलेल्या कुटुंबीयांना पात्र करण्यात यावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

.........

मी आंबोडा येथील रहिवासी असून, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पात्र कुटुंबधारक आहे. परंतु ग्रामसेवकाच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे मला या योजनेत अपात्र घोषित करण्यात आले आहे.

पंजाब ढगे, आंबोडा

मी या योजनेसाठी पात्र असूनसुद्धा ग्रामसेवकांनी केलेल्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे मला या योजनेसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

जितेंद्र सोळंके, भिवरी

घरकुल योजनेत १०६ कुटुंब अपात्र घडण्याच्या प्रकारात ग्रामपंचायत संगणक व्यवस्थापिका यांनी चुकीची माहिती पुरविल्यामुळे हा प्रकार घडला असून, यात माझी कुठलीही चूक नाही.

- सतीश मांजरे

ग्रामसेवक, गट ग्रामपंचायत, भिवरी, आंबोडा, नागलवाडी

Web Title: 106 families disqualified from Gharkul Yojana due to mismanagement of Gram Sevak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.