आणखी १० जणांचा मृत्यू; ५७८ कोरोना पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:40 IST2021-05-16T04:40:02+5:302021-05-16T04:40:02+5:30
जिल्ह्यात कडक निर्बंधाच्या कालावधीतदेखील कोरोनाचा आलेख चढताच असल्याचे दिसून येते. कडक निर्बंधाच्या सात दिवसाच्या कालावधीत ३,१८८ रुग्ण आढळून आले ...

आणखी १० जणांचा मृत्यू; ५७८ कोरोना पॉझिटिव्ह !
जिल्ह्यात कडक निर्बंधाच्या कालावधीतदेखील कोरोनाचा आलेख चढताच असल्याचे दिसून येते. कडक निर्बंधाच्या सात दिवसाच्या कालावधीत ३,१८८ रुग्ण आढळून आले आहेत. कडक निर्बंधापूर्वीच्या सात दिवसातही जवळपास ३१०० रुग्ण आढळून आले होते. शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे कारंजा तालुक्यात आढळून आले आहेत. शुक्रवारी वाशिम तालुक्यात १७३ रुग्ण तर शनिवारी १२८ रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरी भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. कारंजा व वाशिम शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दुसरीकडे मृत्यूसत्रही सुरूच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शनिवारच्या अहवालानुसार उपचारादरम्यान १० जणांचा मृत्यू झाला. एकूण ५७८ जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. वाशिम १२८, मालेगाव तालुक्यातील ९५, रिसोड तालुक्यातील ४८, मंगरूळपीर तालुक्यातील ६७, कारंजा तालुक्यातील १३२ आणि मानोरा तालुक्यात ५७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याबाहेरील ५१ बाधिताची नोंद झाली आहे.
००००००००००००
शहरी भागात चिंतेचे वातावरण
शनिवारच्या अहवालानुसार शहरी भागात अधिक संख्येने रुग्ण आढळून आल्याचे दिसून येते. वाशिम शहरातील सिव्हिल लाईन्स येथील ११ यासह इतर भागात ५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. याशिवाय कारंजा, मंगरूळपीर, रिसोड शहरातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते. शहरी भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
०००००००००००
४९६ जणांची कोरोनावर मात
शनिवारच्या अहवालानुसार नव्याने ५७८ रुग्ण आढळून आले तर ४९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण ४६०१ रुग्ण सक्रिय आहेत.
000000000000
पॉझिटिव्ह ३५२६३
ॲक्टिव्ह ४६०१
डिस्चार्ज ३०२९५
मृत्यू ३६६
00