अपघातात १ ठार
By Admin | Updated: July 22, 2014 23:58 IST2014-07-22T22:17:50+5:302014-07-22T23:58:15+5:30
धोडपनजिक घडलेल्या अपघातात १ जण ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना घडली.

अपघातात १ ठार
शिरपूर जैन: शिरपूर ते मालेगाव रस्त्यावरील धोडपनजिक घडलेल्या अपघातात १ जण ठार तर १ जण जखमी झाल्याची घटना २२ जुलै रोजी संध्याकाळी ७.३0 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार खेर्डावरून शिरपूर मार्गे धोडप येथे जात असतांना धोडपनजिक सामाजिक वनिकरणाच्या फलकाला एम.एच. ३७ के - 0२३२ क्रमांकाच्या हिरोहोंडा सिडी डिलक्स मोटारसायकलने जबर धडक दिली. यामध्ये मोटारसायकलवरील अनिल भाऊराव खंदारे हे जागीच ठार झाले तर गोपाल शांताराम सुरशे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी उपचाराकरीता घटनास्थळावरून हलविण्यात आले होते. या प्रकरणी अद्यापही पोलीसात गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असल्याचे पोलीसांनी सांगितले.