शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
कॅशने घर घेताय? थांबा! होम लोनचा असा करा 'स्मार्ट' वापर! गृहकर्ज फिटेपर्यंत कोट्यधीश व्हाल
4
दिल्ली स्फोट : गाडीतील मृतदेह डॉक्टर उमरचाच; डीएनए जुळला! नक्की कशी पार पडली फॉरेन्सिक प्रक्रिया?
5
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
6
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
7
Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचं 'फिटनेस सीक्रेट'; बिझी शेड्यूलमध्ये स्वत:ला अभिनेत्री कसं ठेवते फिट?
8
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
9
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
10
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
11
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
12
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
14
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
15
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
16
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
17
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
18
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
19
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
20
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
Daily Top 2Weekly Top 5

वसईकरांवर यंदा पाणी कपातीचे विघ्न नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 23:39 IST

यंदाच्या उन्हाळ्यात पालघर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे.

नालासोपारा : यंदाच्या उन्हाळ्यात पालघर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असताना अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. विशेषत: वसई-विरार शहर महानगरपालिकेतील वाढती लोकसंख्या पाहता यंदा वसई-विरारकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल असे वाटत होते. मात्र महानगरपालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात वसई-विरारकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नसल्याचे जाहीर केल्याने दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठ्यातील अडथळे दूर झाल्याने हे शक्य झाल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.मे महिन्यात जिकडे तिकडे पाणीटंचाईचे सावट आहे. मात्र महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने या उन्हाळ्यात वसईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे. वसई-विरार शहराला सूर्या प्रकल्पातून १०० एमएलडी, सूर्या टप्पा ३ मधून १०० एमएलडी तर उसगावमधून २० एमएलडी आणि पेल्हारमधून १० एमएलडी पाणी म्हणजेच एकूण २३० एमएलडी पाणी प्रतिदिन वसई-विरारकरांना मिळत आहे. सध्या धामणी धरणात २४ टक्के पाणीसाठा असून उसगाव धरणात २१.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे. तर पेल्हार धरणात १९.४९ टक्के पाणीसाठा आहे. वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाºÞया धरणात मुबलक साठा असल्याने पाणीकपात केली जाणार नसल्याचे पालिकेने सांगितले. वसई-विरारमधील पाणीकपात तूर्त टळली असली तरी दुष्काळ परिस्थितीत कोठे कोठे पाणी मुरते यावर सर्वेक्षण करून पालिकेने त्यादृष्टीने ठोस प्रयत्न राबवायला सुरूवात केली आहे. प्रामुख्याने पालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना भगदाड पडून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. काही ठिकाणी पाणी चोरी होत आहे. या सर्वांवर चाप लावण्यासाठी महापालिकेने पावले उचलली आहेत. पाणीचोरीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले. सध्या पालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांवर त्याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.महापालिकेने पावसाळ्याआधी करण्यात येणाºया कामांचादेखील आढावा घेतला असून सर्वेक्षणानुसार जुने पंप बदलणे, त्यांची दुरुस्ती करणे, पावसाळ्याआधी यंत्रणा तपासणे ही सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत.मुख्यत: पावसाळ्यात झाडे पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. मासवण आणि धुकटन येथे पाणी खेचण्यासाठी वीज पुरवठ्याची यंत्रणा आहे. मनोर आणि पालघर फिडर हे जंगलातून जात असल्याने त्यावरील फांद्या काप ल्या आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार