शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

औद्याेगिक क्षेत्र पर्यावरण ऱ्हासाला जबाबदार काेण? आर्थिक सुबत्ता पण विकासाचा मार्ग विनाशाकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 01:42 IST

तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्र हे पर्यावरणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील क्षेत्र झाले आहे. येथील पर्यावरणाच्या  झालेल्या प्रचंड हानीला जबाबदार कोण?  हे आकलनापलीकडे असून पाच दशकांतील पर्यावरणीय बदलाचा मागोवा  घेतल्यास सर्वत्र भयावह परिस्थिती पाहावयास  मिळत आहे.

- पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसीतील औद्योगिक क्षेत्र हे पर्यावरणाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील क्षेत्र झाले आहे. येथील पर्यावरणाच्या  झालेल्या प्रचंड हानीला जबाबदार कोण?  हे आकलनापलीकडे असून पाच दशकांतील पर्यावरणीय बदलाचा मागोवा  घेतल्यास सर्वत्र भयावह परिस्थिती पाहावयास  मिळत आहे. त्याचबरोबरच सर्व वयोगटातील अनेकांच्या आरोग्यावर  हाेणाऱ्या परिणामांची हानी कशी भरून काढणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. तारापूर  औद्योगिक क्षेत्रामुळे या संपूर्ण परिसराचा विकास होऊन आर्थिक सुबत्ता  आली; पण प्रदूषणातील वारेमाप वाढीमुळे विकासाचा मार्ग विनाशाच्या दिशेने जात आहे. भविष्यकाळात येणारे संभाव्य धोके ओळखून वेळीच गंभीर दखल घेऊन प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी दूरदृष्टीसमोर ठेवून ठोस व योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याची गरज   आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्र व परिसरातील   पर्यावरणाच्या झालेल्या हानीला मुख्य जबाबदार हे प्रदूषणाचे नियम अक्षरशः पायदळी तुडवून उत्पादन खर्च वाचवून जास्तीत जास्त नफ्याच्या मागे धावणारे काही  उद्योजक तर आहेतच; पण या चुकीच्या व नियमबाह्य काम करणाऱ्यांना पाठीशी घालणारी यंत्रणाही तेवढीच जबाबदार आहे. औद्योगिक क्षेत्रासह  परिसरातील शेतजमिनी, नाले, समुद्र व खाडीकिनारे इत्यादी अनेक ठिकाणची परिस्थिती जलप्रदूषणाच्या  भस्मासुरामुळे अत्यंत भयावह झालेली पाहावयास  मिळत आहे; पण त्याचबरोबरच विहिरी व कूपनलिकेचे पाणीही पिण्यायाेग्य राहिलेले नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.तारापूर औद्योगिक क्षेत्र संपूर्ण देशात प्रदूषणामध्ये प्रथम क्रमांकावर आल्याने येत्या काळात ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर येणारा काळ संकटाचा राहील, हे सांगायला कुणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. भविष्यातील हे संभाव्य धोके ओळखले पाहिजेत. हे सर्व पाहून न पाहिल्यासारखे केले जात असल्याने हे दुर्लक्षच उद्या मोठे संकट ठरणार आहे. प्रदूषणाच्या वणव्यात होरपळ हाेऊ नये म्हणून प्रदूषण टाळण्यासाठीच्या नियमांचे पालन काटेकाेरपणे करणे आवश्यक आहे. हव्यासाला थाेडा लगाम घातला तर प्रदूषणाची तीव्रता निश्चितपणे कमी होईल, अशी आशा पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.  पर्यावरणाचा ऱ्हास कोरोनापेक्षाही घातक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांवर वेगवेगळ्या प्रकारच्या कितीही नोटिसा बजावण्याचा कांगावा केला तरी तारापूरमधील प्रदूषणाचा स्तर दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यावरणाचा सातत्याने होत असलेला ऱ्हास कोरोनापेक्षाही कैकपटीने घातक आहे, याचे भान येणे गरजेचे आहे.  या ज्वलंत प्रश्नाकडे कुणीही फारसे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र दिसत आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे मानवाच्या आरोग्य आणि  स्वास्थ्यावर दुष्परिणाम होत  असल्याने पर्यावरणपूरक विकासाची अत्यंत गरज असून ही सामूहिक जबाबदारी आहे. याची जाण ठेवून पर्यावरणाचा ऱ्हास नियंत्रणात आणण्यासाठी योग्य पद्धतीने कार्यवाही करण्याची गरज आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार