वाडा कोलमला जीआय नामांकन कधी मिळणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 06:02 IST2019-06-29T00:08:37+5:302019-06-29T06:02:20+5:30
कोल्हापूर येथील प्रसिद्ध चपलांना नुकतेच जीआय मानांकन मिळाले मात्र गेली अनेक वर्षे संपूर्ण देशभरातच नव्हे तर परदेशातील मार्केटमध्ये नावारुपाला आलेल्या वाडा कोलम आजही जीआय मानांकनासाठी धडपतो आहे.

वाडा कोलमला जीआय नामांकन कधी मिळणार ?
वाडा - कोल्हापूर येथील प्रसिद्ध चपलांना नुकतेच जीआय मानांकन मिळाले मात्र गेली अनेक वर्षे संपूर्ण देशभरातच नव्हे तर परदेशातील मार्केटमध्ये नावारुपाला आलेल्या वाडा कोलम आजही जीआय मानांकनासाठी धडपतो आहे. या धडपडीला कधी यश येणार असा सवाल वाडा कोलम उत्पादक शेतकरी करीत आहेत.
जंगलाची मिळालेली नैसर्गिक देणगी व सुपीक जमीनीत मोठ्या प्रमाणात एकेकाळी उत्पादन होत असलेल्या वाडा तालुक्यातील वाडा कोलम ने मुंबईतील तांदूळ मार्केटमध्ये वाड्याचे नाव नावारु पाला आणले होते. एक विशिष्ट सुगंध, चवदार, व अत्यंत लहान दाणा असलेल्या वाडा कोलमची वाढती मागणी पाहून काही व्यापाऱ्यांनी वाडा कोलमच्या नावाने बनावट कोलम बाजारात आणून तो वाडा कोलमच्या नावाने विकला. वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वाडा कोलमचे उत्पादन घेण्यासाठी प्रत्यक्ष ५ ते ६ हजार रुपये प्रती क्विंटलला खर्च येत असतांना याच किंवा याच्यापेक्षा कमी दराने बनावट वाडा कोलम विकला जातो आहे. त्यामुळे येथील शेतकºयांनी वाडा कोलम विक्रीस परवडत नसल्याने त्याचे उत्पादन कमी केले. वाडा कोलमला ते मिळावे यासाठी शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.
जीआय मानांकन मिळाल्यास सध्या बनावट वाडा कोलमच्या नावाने होणारी फसवणूक थांबेल.
- हरीभाऊ पाटील,
वाडा कोलम उत्पादक शेतकरी