शाडूच्या गणेशमूर्ती नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 05:51 IST2017-08-09T05:51:12+5:302017-08-09T05:51:12+5:30
येथे आजही परंपरागत महत्व असलेल्या शाडूच्या गणशमूर्तीची मागणी वाढत असलीतरी त्या घडविणारे कारागीर मिळत नसल्याने यंदा येथील चित्रशाळेत अवघ्या ८ ते १० शाडू मातीच्या मूर्ती घडविल्या गेल्या आहेत.

शाडूच्या गणेशमूर्ती नामशेष होण्याच्या मार्गावर
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : येथे आजही परंपरागत महत्व असलेल्या शाडूच्या गणशमूर्तीची मागणी वाढत असलीतरी त्या घडविणारे कारागीर मिळत नसल्याने यंदा येथील चित्रशाळेत अवघ्या ८ ते १० शाडू मातीच्या मूर्ती घडविल्या गेल्या आहेत. यामुळे त्या नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होते आहे.
शहरातील बहुतांश चित्रशाळेत या मूर्ती घडवणारे कारागीरच मिळत नाहीत़ मिळाले तर त्यांची मजूरी देणे परवडत नाही, असे चित्रशाळा चालकांचे म्हणणे आहे़ परिणामी, शाडूच्या मूर्तीची मागणी वाढत असतांनाही कारागिरांच्या टंचाईमुळे व वाढत्या महागाईमुळे या मूर्ती घडविण्याचा व्यवसाय अडचणीत आला आहे़
विक्रमगड शहर व परिसरात या ठिकाणी मूर्तीकारांच्या प्रामुख्याने चित्रशाळा आहेत़ साधारण मेच्या शेवटच्या आठवडयापासून तर जून महिन्यापासून सुरुवातीला गणेश मुर्ती घडविण्याच्या कामांचा श्री गणेशा केला जातो़ त्यानुसार येथील विक्रमगडमधील एकनाथ व्यापारी यांच्या गणेश चित्रशाळेत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आणि घरगुती गणेशमूर्तीवर आता करागिरांचे हात फिरु लागले असले तरी शाडूच्या गणेशमूर्तीची संख्या त्यात नगण्य आहे. विक्रमगड येथे १९७० पासुन व्यापारी बंधू परंपरागत गणेशमूर्ती बनविण्याचे काम करीत आहेत. त्यामध्ये शाडूच्या मूर्ती अवघ्या १० ते १२ असतात. मात्ऱ त्यांना विचारले असतांना ते म्हणतात की, आम्ही या दिवसात दिवसाला प्लास्टर आॅफ पॅरीसच्या २० ते २५ मूर्ती बनवू शकतो मात्र शाडूच्या मातीची एखादी दुसरीच मूर्ती दिवसभरात बनेल कारण ती बनविण्याकरीता ज्या कसबी कारागीरांची आवश्यकता असते त्यांचीच कमतरता आहे. नाही तर ती आम्हांस स्वत:ला बनवावी लागते. या मूर्ती वाळण्यासाठी वेळही खूप लागतो व माती कल्याण शहरातून अगर अन्य ठिकाणाहून आणावी लागते महागाईमुळे ते परवडत नाही असे त्यांनी सांगितले़
दरम्यान गणेशमूर्तीची किंमत ही कलावंताचे कौशल्य, त्यांचे नाव, काम करण्याची पध्दत आणि भाविकांची श्रध्दा यावर अवलंबून असते़ गेल्या काही वर्षात प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्तीची मागणी वाढत असतांनाही शाडूच्या मुर्तींनाही वाढती मागणी आहे़ या मूर्तीला शास्त्रामध्ये मानाचे स्थान आहे. या मूर्ती पाण्यामध्ये सहजरित्या विसर्जीत केल्या जाऊ शकतात़
या चित्रशाळेत ५०० हून अधिक प्लास्टर आॅफ पॅरीसच्या तर १० ते १२ शाडूच्या गणेशमूर्ती बनविल्या जात आहेत. त्यांच्या घरात गेल्या कित्येक वर्षापासून शाडूच्या मातीच्या मूर्तीची स्थापना केली जाते़
शाडूची मूर्ती छोटीच
त्यांनीही सांगीतले की प्लास्टर आॅफ पॅरीसच्या गणेश मूर्ती जरी वजनाला हलक्या असल्या तरी त्या पर्यावरणाला धोका पोहचविणाºया आहेत़ आम्ही ६ ते ८ फुटांची मोठी मूर्ती बनवितो परंतु त्यापेक्षा जास्त मोठी मूर्ती जर शाडुची बनविली तर त्यास धोका असतो व मोठी मूर्ती शाडुची बनविली जात नाही़.