दमदार हजेरीने वाघोबा खिंडीतील धबधबा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 00:17 IST2019-06-29T00:17:04+5:302019-06-29T00:17:22+5:30
पावसाने रात्रीपासून दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून वाघोबा खिंडीतील धबधबा वाहूू लागल्याने पर्यटकांची त्या ठिकाणी गर्दी होऊन ते त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत.

दमदार हजेरीने वाघोबा खिंडीतील धबधबा सुरू
मनोर - पावसाने रात्रीपासून दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून वाघोबा खिंडीतील धबधबा वाहूू लागल्याने पर्यटकांची त्या ठिकाणी गर्दी होऊन ते त्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने सर्वच ठिकाणी दमदार हजेरी लावली असून जिल्ह्यातील पालघर डहाणू तलासरी जव्हार मोखाडा विक्र मगड वाडा या सर्व तालुक्यात जोरदार सरी बरसत आहेत. सर्वच ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून डोंगरातून वाहणारे धबधबेही वाहायला सुरु वात झाली आहे. पालघर मनोर रोडवरील वाघोबा खिंडीतील धबधबा ओसंडून वाहत वाहतो आहे. येथे काही पर्यटक त्याचा आनंद लुटत आहेत. चांगल्या प्रकारे पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामाला सकाळपासून जोमाने सुरवात केली आहे तर वसई मुंबई ठाणे येथील रहाणाऱ्या नागरिकाना पाण्याची चिंता होती. ती आता दूर झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस पडत आहे. त्या मुळे त्यांनाही समाधान वाटते आहे.