शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

स्वच्छतादूत सुशीलाची रोजगारासाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:40 AM

दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणतेय.

रवींद्र साळवे मोखाडा : दुपारच्या रणरणत्या उन्हात सात महिन्यांची गर्भवती हातात पहार घेऊन खड्डा खणतेय. मधूनच क्षणभर विसावत घाम पुसते. पुन्हा एकाग्रतेने काम सुरू. तीन दिवस सतत काम करून ती हा खड्डा पूर्ण करते. पुढच्या चार दिवसांत या शोष खड्ड्यावर स्वच्छतागृह उभे राहते.हे सगळे केले आहे सुशीला खुरकुटे यांनी. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील नांदगाव या छोट्याशा गावातील जिद्दी महिला. २०१७ मध्ये पालघर जिल्हा स्वच्छता अभियानाच्या त्या ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शक्ती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानही करण्यात आला. तसेच राष्ट्रीय पातळीवर निवडल्या गेलेल्या अशाच ३० जिगरबाज महिलांसोबत सुशीला यांचेही नाव जोडले गेले. यामुळे सहाजिकच सरकार आमच्याकडे लक्ष देईल, असे त्यांना वाटतं होते. परंतु मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे हे कुटूंब आजही रोजगारासाठी भटकत आहे.गावातील इतर महिलांप्रमाणे सुशीला यांना उघड्यावर प्रातर्विधीसाठी जावे लागायचे. त्यांनी स्वच्छ भारत अभियानाबद्दल ऐकले. घरात स्वच्छतागृह असायला हवे. त्यातून स्वच्छता राहील आणि आपल्या कुटुंबाचे, मुलांचे आरोग्यही जपता येईल, हे पंतप्रधान मोदींचे विचार तिला मनोमन पटले. मजूर लाऊन खड्डा खोदण्या इतपत सुशीलाकडे पैसे नव्हते आणि मदतीला पतीला घ्यावे तर रोजगार बुडणार. मग सुशीला यांनी स्वत:च पहार घेऊन काम सुरू केले. याच दरम्यान ‘युनिसेफ’चे सल्लागार जयंत देशपांडे तिथून जात असताना त्यांनी सुशीला यांचा काम करताना फोटो काढला. राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सचिव राजेश कुमार यांनी याची दखल घेत सुशीलाबार्इंचे नाव केंद्र सरकारकडे धाडले.केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता सचिव परमेश्वर अय्यर यांनी तो टिष्ट्वट केला आणि चक्र े फिरली. मोदी सरकारने सुशीला यांना तत्काळ मदत करत त्यांच्यासाठी स्वच्छतागृह बांधून पूर्ण केले. शिवाय त्या गावातील इतर महिलांचे प्रेरणास्थान व्हावे म्हणून पंतप्रधान मोदींनी त्यांना स्वच्छतादूत बनवले. संपूर्ण पालघर जिल्ह्याच्या त्या ‘स्वच्छतादूत’ झाल्या.पंतप्रधान कार्यालयाने सुशीलाबार्इंच्या कामाची नोंद घेतली. महाराष्ट्रातून पाठवलेल्या १५ नावांमधून त्यांना राष्ट्रीय पातळीवर शक्ति सन्मानासाठी निवडले व गुजरातमधील गांधीनगर येथे ८ मार्च २०१७ रोजी महिला दिनी खुद्द पंतप्रधानांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.सुरुवातीला त्या अनेकवेळा माध्यमांसमोर झळकल्या परंतु माध्यमांसमोर झळकल्याने पोटाची खळगी थोडीच भरणार होती. त्यामुळे तिचा हा सन्मान सत्कार सोहळा पुरस्कारापुरताच मर्यादित राहिल्याचे म्हणावे लागेल. पंतप्रधान यात लक्ष घालणार का खरा प्रश्न आहे.>सरकारी मदतीपासून वंचितसुशीला यांना सरकारी मदत तर सोडाच परंतु स्वच्छतादूत असलेल्या त्यांना आजपर्यंत कोणत्याही सरकारी कार्यक्र मातही बोलावण्यात आलेले नाही. सरकारकडून कोणतीच मदतही मिळाली नाही. आजही या कुटुंबाचा रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे. सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेचा लाभही सुशीलाच्या कुटुंबाला मिळालेला नाही. दरवर्षीच सुशीलाच्या कुटुंबीयांना रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागते. यामुळे सरकारने या कुटुंबीयांना रोजगार दिला असता तर त्यांना स्थलांतरित तरी व्हावे लागले नसते, असे मत युवा आदिवासी संघटनेचे जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.>मोदी दादा मला स्वच्छतादूत बनवलं हे तू चांगलं केलं, परंतु मला काम दिलं नाही. काम दिलं असतं तर मला माझ्या लहान मुलांना कामासाठी बाहेरगावी घेऊन जावं लागलं नसतं. म्हणून तू मला काम दे’.- सुशीला खुरकुटे,स्वच्छतादूत, पालघर