Virar: विरारमध्ये घरातील स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू, ११ दिवसांतील तिसरी घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 15:10 IST2025-06-01T15:06:32+5:302025-06-01T15:10:18+5:30
Virar Slab Collapses News: विरारमध्ये राहत्या घराचा स्लॅब कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Virar: विरारमध्ये घरातील स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू, ११ दिवसांतील तिसरी घटना
विरार पश्चिम येथील एका अपार्टमेंटमध्ये घराचा स्लॅब कोसळून एका ५४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
अल्फिया अब्बास मानसवाला असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अल्फिया आपल्या कुटुंबासह एमबी इस्टेट परिसरातील मर्चंट अपार्टमेंटमध्ये सी-विंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ११ मध्ये राहत होती. घटनेच्या दिवशी अल्फिया तिच्या पतीसह हॉलमध्ये झोपले होती. तर, तिचा मुलगा, सून आणि नातवंड बेडरूममध्ये झोपले होते. दुपारी अचानक हॉलचा स्लॅब कोसळला. या घटनेत अल्फिया गंभीर जखमी झाली. तिला ताबडतोब विरारमधील संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली, अशी माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राम कुंडगीर यांनी दिली. हा अपघात नेमका कशामुळे घडला? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.