शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडचा गावठी कोलम होतोय नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 05:56 IST

राहुल वाडेकर विक्रमगड: कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास गोडीस, रुचकर व मागणी जास्त असलेल्या विक्रमगडच्या प्रसिध्द गावठी कोलम (झीनी) तांदळाची पूर्वीप्रमाणे लागवड होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ तो सध्या नामषेश होण्याच्या मार्गावर आहे़. कारण उत्पादीत मालाला कमी बाजारभाव, मजुरीचे वाढते दर, शेतीसाहित्याचा वाढलेल्या किंमती, महागाई आणि महत्वाचे ...

राहुल वाडेकर विक्रमगड: कमी कालावधीत प्रसिध्द पावलेला व खाण्यास गोडीस, रुचकर व मागणी जास्त असलेल्या विक्रमगडच्या प्रसिध्द गावठी कोलम (झीनी) तांदळाची पूर्वीप्रमाणे लागवड होत नसल्याने त्यांचे उत्पादन दिवसेंदिवस घटत चाललेले आहे़ तो सध्या नामषेश होण्याच्या मार्गावर आहे़. कारण उत्पादीत मालाला कमी बाजारभाव, मजुरीचे वाढते दर, शेतीसाहित्याचा वाढलेल्या किंमती, महागाई आणि महत्वाचे म्हणजे निसर्गाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील घेतल्या जाणाºया या लहान दाण्याच्या भाताचे उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे़ शेतकरी सध्या त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे एक चांगले वाण धोक्यात आले आहे़ सध्या हा तांदुळ बाजारात दुकानावर ५५ ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे़आजची तरुणाई शेतीबाबत उदासीन आहे. काही ठिकाणी नवनवीन सुधारीत जातीच्या वाणांची लागवड केली जात असल्याने या तांदळाचे उत्पादन घटले आहे. याच्या उत्पादनासाठी मेहनतीच्या जोडीला मोठा खर्च करावा लागतो. निसर्गाने साथ दिली तर ठिक नाही, तर शेतकºयांच्या वाट्याला नुकसानच येते. या वाणाला कीड लवकर लागते व त्यापासून खूप जपावे लागते. तशी मेहनत घ्यावी लागते़ त्यामुळे या भातपिकाला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे विक्रमगड येथील शेतकरी घनश्याम आळशी यांनी लोकमतला सांगितले.विक्रमगड तालुक्यातील मृदा, पावसाचे प्रमाण व अनुकूल हवामान पाहता साधारण अडीच दशकांपूर्वी विक्रमगड कोलम या भातपिकाचे मोठया प्रमाणात सर्वत्र शेतकºयांकडून उत्पादन घेतले जात होते. एक सेंटिमीटर लांबीचा असणारा शुभ्र दिसणारा तांदूळ आणि त्याला येणारा गोड सुगंध यामुळे हा तांदूळ खाण्यासाठी अतिशय रुचकर म्हणून ओळखला जातो. पूर्वी भात पिकाच्या मोजक्या जाती होत्या. त्यात कोलम तांदळाला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे या भात पिकाची कोठारे तालुक्यातील विविध भागातील आदिवासी व कुणबी शेतकरी कणग्यांमध्ये भरुन ठेवत असे. मात्र अलिकडे भात पिकांच्या संकरित व सुधारित जातींमुळे या पिकाची जात दुर्लक्षित होऊन आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या जातीवरही कृषी विद्यापीठातून संशोधन होण्याची आवश्यकता आहे.