शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

वसई-विरारकर पाहत आहेत एसटी बसची आतुरतेने वाट; नागरिकांचे हाल सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 12:20 AM

महापालिकेची परिवहन सेवा अद्याप बंदच

वसई : वसई-विरारच्या शहरी व ग्रामीण भागात पोहोचलेली महापालिकेची परिवहन सेवा अद्यापही बंद असून पालिकेने नव्याने ठेकेदार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या विलंबामुळे वसईतील सर्वसामान्य नागरिकांचे मात्र पुरते हाल होत आहेत. यामुळे आता वसईकर एसटी बसेसची आतुरतेने वाट पाहत आहेत.

वसईकरांसाठी एसटी सेवा सुरू करण्याचे साकडे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांना शिवसेनेच्या मिलिंद खानोलकर यांनी दोन दिवसांपूर्वी घातले आहे. वसईतील नागरिकांच्या सोयीसाठी एसटी तातडीने सुरू करावी, अशी मागणी आता वसईकरांमधूनही केली जात आहे. दरम्यान, राज्य परिवहन सेवा मंडळाची एसटीची सेवा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. ही सेवा वसई तालुक्यातही सुरू होती.वसईत १५० वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून नगरपरिषद अस्तित्वात होती. शिक्षण, व्यवसाय, नोकरी अशा अनेक कारणास्तव वसईकर हे मुंबईवर अवलंबून असताना एसटी सेवाच बंद आहे हे दुर्दैव आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेचा प्रवास करण्यासाठी ग्रामीण भागातून रेल्वे स्थानकात पोहोचण्याकरिता बहुतांश किलोमीटरचा प्रवास एसटीने पार करून वसईकर मुंबईकडे जात होते. मात्र महापालिकेची परिवहन सेवा सुरू झाल्याने तोट्याचे कारण देत एसटीने वसई-विरारमध्ये सेवा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे महापालिकेची परिवहन सेवा हद्दीत सेवा देते, मात्र कोरोनाच्या काळात बंद झालेली परिवहन सेवा अजूनही बंदच आहे. त्यामुळे वसईकरांना दळणवळणाचे स्वस्त साधनही आता उरले नाही.

एसटी सेवा म्हणजे उद्योगास चालना

  • पहाटेच्या वेळी ३.३० वाजताच्या चर्चगेट लोकलसाठी रेल्वे स्थानक गाठण्यासाठी आणि रात्री २.३० वाजण्याच्या सुमारास शेवटच्या चर्चगेट-विरार लोकलने परतीच्या प्रवासी नागरिकांसाठी वर्षानुवर्षे एसटीची सेवा मिळत होती. 
  • वसईचे दूधविक्रेते, फुलविक्रेते, भाजीविक्रेते, शिक्षिका, विद्यार्थी, नोकरवर्ग यांच्यासाठी ही व्यवस्था कमी खर्चिक असल्याने मोठ्या प्रमाणावर एसटीमधून प्रवास होत होता. मात्र आज ग्रामीण भागात रात्री व पहाटेच्या वेळी रिक्षा किंवा कोणतीही अन्य परिवहनाची सोय नाही. 
टॅग्स :state transportएसटी