जिल्ह्यातील शिक्षक कर्मचारी उद्या करणार घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 06:14 IST2018-04-06T06:14:19+5:302018-04-06T06:14:19+5:30

डिसीपीएस (परिभाषित अंशदायी पेन्शन योजना) ही अन्यायकारक योजना बंद करु न जुनी योजना लागू करावी तसेच शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी रोखणारा २३ आॅक्टोबर चा शासन निर्णय रद्द करावा आदी मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातिल शिक्षक व इतर विभागातील शासकीय कर्मचारी

Vasai Virar Teacher news | जिल्ह्यातील शिक्षक कर्मचारी उद्या करणार घंटानाद आंदोलन

जिल्ह्यातील शिक्षक कर्मचारी उद्या करणार घंटानाद आंदोलन

पालघर - डिसीपीएस (परिभाषित अंशदायी पेन्शन योजना) ही अन्यायकारक योजना बंद करु न जुनी योजना लागू करावी तसेच शिक्षकांची वरिष्ठ वेतन श्रेणी रोखणारा २३ आॅक्टोबर चा शासन निर्णय रद्द करावा आदी मागण्यांसाठी पालघर जिल्ह्यातिल शिक्षक व इतर विभागातील शासकीय कर्मचारी शनिवारी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालया समोर घंटानाद आंदोलन करणार आहेत.
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीयसेवेत रुजू झालेल्या शिक्षक व इतर शासकीयकर्मच्याऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना बंद करु न शासनाने डिसीपीएस ही अन्यायकारक पेन्शन योजना लागू केली होती. मुळात डिसीपीएस ही पेन्शन योजनाच फसवी असून आर्थिक लूट करणारी आहे, तशेच मृत्यू पश्चात या योजनेतून कर्मचाºयांच्या कुटूंबियांना कुठलीही आर्थिक मदत दिली जात नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
या आर्थिक लूट करणाºया योजने विरोधात मागील तीन वर्षापासून शिक्षक लढा देत आहेत. या योजना लागू करु न शासनाने २००५ नंतर शासकीयसेवेत आलेल्या शिक्षकांची फसवणूक करताना पेन्शन बंद केली. तर आता बारा वर्ष सेवा केल्यानंतर लागू होणारी हक्काची वरिष्ठ वेतन श्रेणी बंद करणारा शासन निर्णय लागू करु न शासनाने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. २३ आॅक्टोबर २०१७ रोजी शासनाने शिक्षक विरोधी शासन निर्णय काढताना संबधित शिक्षकाची शाळा ‘अ’ श्रेणीत असेल तरच त्याना लागू होणारी वरिष्ठ वेतन श्रेणी मिळेल अन्यथा नाही. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये तिव्र असंतोष पसरला असून हा निर्णय म्हणजे तरु ण शिक्षकांच्या जखमेवर मिठ चोळणारा व शिक्षकांमध्ये भेदभाव निर्माण करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
आगोदर शिक्षण सेवक योजना लागू करु न तरु ण शिक्षकांना वेठिबगारी करायला लावली त्यानंतर पेन्शन योजना बंद केली व आता वरिष्ठ वेतन श्रेणी बंद करु न शासन शिक्षकांवर मोठा अन्याय करीत पिळवणूक केली जात असल्याने राज्यकर्त्यांना जागे करण्यासाठी यावेळी घंटानाद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये हजारो शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या जिल्ह्यातिल सर्व डिसीपीएस धारक शिक्षकांनी घंटानाद आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहभागी होऊन सहकार्य करावे अशे आवाहण जिल्हाध्यक्ष नितीन तिडोळे उपाध्यक्ष प्रदिप गायकवाड,कार्याघ्यक्ष लक्ष्मण ननावरे, प्रवक्ते दत्ता ढाकणे, सचिव मारुती बंढे, राज्य उपाध्यक्ष शैलेस पाटिल, राज्य समन्वयक संभाजी पोळ, दत्ता मदने, मारोती सांगळे, तालुका अध्यक्ष अशोक बर्गे, भालचंद्र पाटील, विष्णू चवरे, संदिप कथोरे, केरु शेकडे, वेंकट लोकरे इत्यादी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केले आहे.

मागिल बारा वर्षांपासून राज्यातील तरु ण शिक्षकांवर शासनाकडून सतत अन्याय केला जात आहे. आगोदर शिक्षण सेवक ही वेठिबगार योजना सुरु केली.नंतर पेन्शन योजना बंद करून जखमेवर मिठ चोळले. आता वेतन श्रेणी नाकारु ण शासन आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे. दत्ता ढाकणे.
-जिल्हा प्रवक्ते, जुनी पेन्शन हक्क संघटना जिल्हा पालघर

Web Title: Vasai Virar Teacher news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.