शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांसमोर बालेकिल्ला राखण्याचे, तर महायुतीपुढे वर्चस्व गाजवण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 10:46 IST

ही ‘अस्तित्वाची लढाई’ वसई-विरारच्या भविष्याची दिशा ठरवणारी असेल.

वसई-विरार, मंगेश कराळे,  प्रतिनिधी

जवळपास दहा वर्षांनी वसई-विरार महापालिकेची निवडणूक होत असून, येथील राजकीय वातावरण तापले आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नसून, ती खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई ठरत आहे. यावेळी प्रस्थापित सत्ताधारी आणि नव्याने पाय रोवू पाहणारे विरोधक यांच्यात काटे की टक्कर रंगणार आहे. ही ‘अस्तित्वाची लढाई’ वसई-विरारच्या भविष्याची दिशा ठरवणारी असेल.

यंदा वसई-विरार महापालिका जिंकण्याच्या उद्देशाने भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी बहुजन विकास आघाडी, काँग्रेस व मनसेला सोबत घेऊन मैदानात उतरली आहे, तर उद्धवसेनेने वेगळी चूल मांडली आहे. त्यातच दहा वर्षांपासून महापालिकेची निवडणूक न झाल्याने यंदाची निवडणूक लढवण्यासाठी माजी नगरसेवकांसह बहुतांश पदाधिकारी, कार्यकर्ते इच्छुक होते; मात्र या युती, आघाड्यांमुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कापल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. 

अनेक वर्षे वसई-विरारवर एकहाती वर्चस्व राखणाऱ्या बहुजन विकास आघाडीसमोर बालेकिल्ला राखण्यासह आपले अस्तित्व टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. 

मतदारांची नाराजी दूर करणे आणि केलेल्या कामांचा हिशोब देणे ही त्यांच्यासाठी मुख्य कसरत ठरणार आहे. बविआने ११५ पैकी ११३ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत, तर दुसरीकडे, महापालिकेत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी भाजप-शिंदेसेने कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे त्यांचा उत्साह वाढला आहे. 

प्रत्येकाने प्रभागागणिक मोर्चेबांधणी केल्याने प्रत्येक जागा मिळवण्यासाठी निकराची लढत होणार आहे. पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि शहरातील अनधिकृत बांधकामे या मुद्द्यांभोवतीच प्रचाराची राळ उडण्याची शक्यता आहे. तरुण मतदारांचा कल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. दुसरीकडे उमेदवारांना प्रचारासाठी मिळणारा कमी वेळ लक्षात घेता उमेदवारांकडून पर्याय म्हणून सोशल मीडियाचा आधार घेतला जात आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते वसई-विरारमधील मतदार आता अधिक सजग झाला आहे. त्यामुळे हा संघर्ष केवळ दोन पक्षांमधील नसून, जुन्या वारसाचा आणि नवीन बदलाचा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात वसई-विरारच्या राजकीय आखाड्यात नेमके कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

११५ जागांसाठी ५४७ उमेदवार रिंगणात

वसई-विरार मनपा निवडणुकीत भाजप ९५, बविआ ११३, उद्धवसेना ८९, शिंदेसेना २७, वंचित ११, सपा ५, बसपा १२, राष्ट्रवादी अजित पवार १४, काँग्रेस ११, एमआयएम ८, उत्तर भारतीय विकास सेना ८, आप ६, अखिल भारतीय सेना १, रिपब्लिकन सेना १, जनता काँग्रेस १ आणि अपक्ष १४५ असे एकूण ११५ जागांसाठी ५४७ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

स्वच्छता, पाणी, खड्डे, वाहतूक कोंडी हे निवडणुकीतील कळीचे प्रश्न आहेत. मोठ्या कालखंडानंतर निवडणूक होत असल्याने उमेदवारांकडू मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत.  त्या नगरसेवकांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल.   

English
हिंदी सारांश
Web Title : Vasai-Virar Elections: Incumbents Defend, Alliance Seeks Dominance Amidst Tight Race

Web Summary : Vasai-Virar municipal elections see a multi-cornered fight after a decade. Incumbents face a tough challenge to retain their stronghold, while alliances aim to establish dominance. Key issues include water scarcity and unauthorized constructions. 547 candidates are contesting for 115 seats.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Vasai Virar Municipal Corporation Electionवसई विरार महानगरपालिका निवडणूक २०२६Vasai Virarवसई विरार