शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेवेळी उमेदवारांवर विविध प्रश्नांचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 00:50 IST

व्यासपीठावर आरोप-प्रत्यारोप : उमेदवारांनी मांडला लेखाजोखा

वसई : वसईच्या मतदारांना विविध पक्षांची राज्यासाठीची धोरणे समजावी, या उद्देशाने वसईतील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी महासंघ, जागरु क नागरिक संघटना आणि प्रा. स. गो वर्टी मेमोरिअल ट्रस्ट यांच्यातर्फे ‘विधानसभेसाठी आम्हीच का? ’ या कार्यक्र माचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंचावर बविआचे अध्यक्ष तथा वसई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आ. हितेंद्र ठाकूर, मनसेचे उमेदवार प्रफुल्ल ठाकूर उपस्थित होते. तर, महायुतीचे उमेदवार विजय पाटील अनुपिस्थत असल्याने त्यांच्यातर्फे मिलिंद खानोलकर यांनी आपली भूमिका मांडली.महाराष्ट्र नवानर्माण सेनेचे प्रफुल्ल ठाकूर यांनी पाणीप्रश्न, कचरा व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे, मोकळ्या सरकारी जागा, वीजव्यवस्थापन, शिक्षणाच्या सुविधा, परिवहन सेवा, पर्यावरण, आरोग्य सुविधा इत्यादी मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. तर मुसळधार पाऊस पूर्वीही यायचा, परंतु तेव्हा वसई बुडत नव्हती. आता दोन तास जरी पावसाचा शिडकावा झाला तरी अवघी वसई पाण्याखाली जाते. हे कोणाचे अपयश आहे, अशी विचारणा मनसेने केली आहे.

तर सेना-भाजप महायुतीचे उमेदवार विजय पाटील यांचे प्रतिनिधी मिलिंद खानोलकर यांनी यावेळी महापालिकेची परिवहन सेवा कंत्राटदाराच्या सोयीसाठी चालविण्यात येत असल्याचे सांगितले. तर महापालिकेने घरपट्टी आकारताना कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. अशाचप्रकारे ६९ गावांचा पाण्याचा प्रश्न अद्यापही अधांतरीच आहे. याशिवाय वसईत सुसज्ज असे शासकीय रुग्णालय नाही. समुद्रकिनाऱ्यांवर पुरेसे धूपप्रतिबंधक बंधारे नाहीत. परिणामी मच्छीमार आणि बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे, अशा अनेक समस्यांना त्यांनी हात घातला.नको त्या गोष्टींचा विरोधक बागुलबुवा करतातया सगळ्या आक्षेपांना आ. हितेंद्र ठाकूर यांनी रोखठोक उत्तर दिले. वसई - विरारमध्ये कोणतीही समस्या असली की त्यामागे आपलेच नाव घेतले जाते. या भागातून विधानपरिषद, शिक्षक, पदवीधर आदी माध्यमांतून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींना अजिबात जाब विचारला जात नाही. मात्र, ही टीका मी सकारात्मकरित्या घेतो. हे मी माझे यश समजतो. आपण शहराच्या विकासावर मते मागत आहोत आणि विरोधकांकडे एकही मुद्दाच नसल्यामुळे ते नको त्या गोष्टींचा बागुलबुवा उभा करून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असे त्यांनी सांगितले.