शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

वसईकरांची कालोबा नदी सततच्या प्रदूषणाने गुदमरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 01:53 IST

नदी ही प्राणवाहिनी असून अनेक सजीवांची आधारशिला असते.

अजय महाडीक  मुंबई : नदी ही प्राणवाहिनी असून अनेक सजीवांची आधारशिला असते. मात्र, मुंबईतील मिठीपाठोपाठ वसई तालुक्यातील कालोबा नदीपात्राची कामण-चिंचोटी परिसरात पार गटारगंगा झाल्याने वसईकरांची कालोबा मैली म्हणण्याची पाळी आली आहे. येथील ६७ गायीम्हशींच्या गोठ्यांतील मलमूत्र व वेस्टेजमुळे नदीपात्रामध्ये एकेकाळी असणाऱ्या माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या आहेत. या ठिकाणी मिळणाºया निवठे व कोळंबी या प्रजाती आठ ते दहा वर्षांपूर्वीच येथून गायब झाल्याचे कामण गावातील ग्रामस्थ सांगतात.या मलमूत्रामुळे येथील नदीकिनाºयावरील खंडीपाडा हे गाव विस्थापित होण्याच्या मार्गावर आहे. साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या कामण गावातही मलेरिया, टायफॉइडची साथ नेहमीचीच असल्याचे गावकरी सांगतात. येथे असणाºया कामण आश्रमशाळा व वसतिगृहातील ५५० विद्यार्थ्यांना याची बाधा होत असल्याचे व्यवस्थापक बागुलसर सांगतात. न्याहारीला व रात्री जेवताना खत प्रकल्पावरील असंख्य पाखरे अन्नात पडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार असून त्यामुळे उलटी व हगवण असे आजार होत आहेत. या त्रासामुळे अनेक हॉटेल व ढाबेवाल्यांना आपले व्यवसाय गुंडाळावे लागले असल्याचे मेघनाथ भगत व कमलाकर कामणकर हे ग्रामस्थ सांगतात.शेणाची वाहतूक करताना बंदिस्त वाहनातून होणे अपेक्षित आहे. तसेच रस्त्याशेजारचे खत प्रकल्प प्रदूषण नियंत्रण बोर्डाला मंजूर नाहीत. याप्रक रणी वसई-विरार शहर महानगरपालिकेने गोठ्यातील सांडपाणी पक्क्या गटारात जाईल, अशी व्यवस्था करावी. शौच खड्डे खोदून त्यासाठी उतार देऊन पक्के सिमेंटचे नाले बांधावे. मलमूत्रावर प्रक्रिया करणारे गोबर गॅस प्रकल्प तयार करावेत. कंपोस्ट खड्डे खोदावेत. स्लज व डाइंग बेड बांधावेत तसेच चिंचोटी-कामण येथील रहिवाशांना त्रास होऊ नये, म्हणून रस्त्याच्या कडेला शेण सुकवू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. गंभीर इशारा देणाºया नोटीस तब्बल ६७ जणांना दिल्या आहेत. मात्र, नोटीस देण्याचा हा प्रकार नेहमीचा असल्याने त्याचा कोणताही परिणाम गोठेवाल्यांवर होत नाही.कामण-चिंचोटी व तुंगारेश्वर अभयारण्यात तबेलावाल्यांकडून शेण सुकवले जाते. त्यासाठी राखीव असणाºया जमिनीवर आतापर्यंत प्रचंड वृक्षतोड झाली आहे. यात नैसर्गिक वनसंरक्षक असणाºया तिवरांचा मोठा बळी गेला असून वनस्पती नामशेष झाल्यात. ही झाडे तोडल्याची तक्रार ग्रामस्थ करीत असल्याने तबेलेवाले त्यावर विष वा, केमिकलची फवारणी करतात, असे भगवान पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी गोखिवरे व मांडवी रेंजकडून कागद रंगवले जात असून वनअधिकाºयांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप गावकºयांनी केला.१कामण व चिंचोटी रस्त्यालगत अनधिकृतरीत्या उभ्या राहिलेल्या खत प्रकल्पांमुळे शेकडो एकर वनजमीनही बाधित झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा सुकणारे शेण व शेणाची ही वाहतूक उघड्या ट्रक व ट्रॅक्टर-ट्रॉलीद्वारे होत असते. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर शेणाचा सडा पडत असल्याने येथे दुचाकी व रिक्षांच्या अपघातांचे प्रमाण मोठे आहे. २रस्त्याच्या आजूबाजूची जमीन वनविभागाची असून गत दोन-तीन महिन्यांपासून तिचा चार्ज मांडवी रेंजकडे आहे. मात्र, त्याअगोदर ही जमीन गोखिवरे रेंजच्या अखत्यारित होती. याप्रकरणी मांडवी रेंजचे आरएफओ चंद्रशेखर गावण यांनी पुरेशे मनुष्यबळ नसून कारवाईसाठी वेळेवर पुरेसे पोलीस संरक्षण मिळत नसल्याचे कारण पुढे केले आहे. ३या संदर्भामध्ये कामणवासियांनी भजनलाल डेअरी वर आरोप केले असले तरी नारायण रोहरा यांनी आॅल इज वेल असल्याचे सांगितले. तर त्यांचे पूत्र संजय रोहरा यांनी महानगरपालिकेकडून नोटीस दिल्या जातात पण आम्हाला सुविधा मिळतात का? असा सवाल केला. या भागातील मलकानी कंपाऊडमध्ये असणाºया ४५ म्हशींच्या गोठ्यातून मोठ्या प्रमाणात मल-मुत्र उघड्यावर विसर्जित होत असल्याचे पाहणीमध्ये आढळले.