तुकाराम रोकडे -
खोडाळा : आखाती देशातील युद्धामुळे देशासह राज्यात इंधन व गॅसटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे सिलिंडर मिळवताना नागरिक हैराण होत आहेत. मात्र, खोडाळा गावातील चंद्रकांत बारगजे या तरुणाने देशी जुगाड करून सिलिंडरला पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीत वापरलेले ऑइल शेगडीत इंधन म्हणून वापरले आहे. एक लिटर ऑइलवर तीन ते चार तास शेगडी सुरू राहत असल्याने या शेगडीची चर्चा तालुक्यात सर्वत्र होत आहे.
खोडाळा गावातील चंद्रकांत बारगजे या वेल्डरने आपल्या बुद्धिकौशल्याने वाहनातील वापरलेल्या व पुन्हा वापरात न येणाऱ्या इंधनावर ज्वाला प्रज्वलित करून दाखवल्या आहेत. बारगजे यांनी अवघे तीन हजार रुपये खर्चून ही शेगडी तयार केली आहे. व्यवसायातील टाकाऊ वस्तूंपासून एक शेगडी तयार करून १ हजार २०० रुपयांचा पंखा विकत घेतला आहे. त्याला १२ व्होल्टेजची बॅटरी बसवून ही शेगडी कार्यान्वित केली. मजुरीसह तीन हजार रुपये खर्च झाल्याचे बारगजे म्हणाले.
जेएनपीएच्या सवलती ‘अर्थ’ हीन, वाहतूकच बंदचउरण : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखातातील मालवाहतूक ठप्प झाल्याच्या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीए) प्रशासनाने आयात-निर्यातदारांत सवलती जाहीर केल्या. या सवलती निष्फळ ठरत असल्याची प्रतिक्रिया शिपिंग कंपन्या आणि व्यापाऱ्यांकडून उमटू लागली आहे.
आयात-निर्यातदारांना जेएनपीएने दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शिपिंग कंपन्यांनी संबंधित शुल्कांची आगाऊ भरपाई करण्याची अट ठेवल्याचे जेएनपीएच्या कंटेनर वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी गिरीश थॉमस यांनी दिली. दरम्यान, सवलतींचा प्रत्यक्षात फायदा होत नसल्याची प्रतिक्रिया कंटेनर शिपिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुनील वासवानी यांनी दिली.
Web Summary : Facing fuel scarcity, Chandrakant Bargaje from Khodala ingeniously uses engine oil to fuel a stove. This cost-effective solution, costing ₹3,000, provides 3-4 hours of cooking time per liter, drawing widespread attention.
Web Summary : ईंधन की कमी का सामना करते हुए, खोडाला के चंद्रकांत बारगजे ने इंजन तेल का उपयोग करके एक चूल्हा बनाया। यह किफायती समाधान, ₹3,000 की लागत से, प्रति लीटर 3-4 घंटे खाना पकाने का समय प्रदान करता है, जिससे व्यापक ध्यान आकर्षित हो रहा है।