मातीचा ढिगारा पडून दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 20:59 IST2020-04-10T20:52:50+5:302020-04-10T20:59:05+5:30
रस्त्यालगतची माती घेण्यासाठी खोदकाम करीत होते, यात खोदकाम करताना अचानक वरतून मातीचा ढिगारा सरकला आणि पूर्ण धस तेथे काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर येऊन पडली.

मातीचा ढिगारा पडून दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी
हुसेन मेमन
जव्हार - जव्हार तालुक्यातील बोरहट्टी गावातील आदिवासी शेतकरी घरांसाठी माती काढताना मातीचा धस (ढिगारा) पडून दोन जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला तर इतर दोन जणांना गंभीर दुखापत तर चार जणांना किरकोळ दुखापत झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली असून मृतांमधील एक अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. पावसाळाजवळ आल्यामुळे घराला लेप करण्यासाठी बोरहट्टी गावातील काही आदिवासी बांधव शेतातील माती घेण्यासाठी कुटुंबातील नातेवाईक मिळून एकूण आठ व्यक्ती गेले होते. यामध्ये आठ पैकी सात महिला असून चार अल्पवयीन होते.
रस्त्यालगतची माती घेण्यासाठी खोदकाम करीत होते, यात खोदकाम करताना अचानक वरतून मातीचा ढिगारा सरकला आणि पूर्ण धस तेथे काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर येऊन पडली. या ढिगाऱ्यात मोठं मोठे दगड होते यात तेथील मनोज यशवंत जाधव आणि मुक्ता सुदाम तराळ ही 16 वर्षीय अल्पवयीन असून हिचाही मातीखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच यात दोन व्यक्तींना गंभीर दुखापत झाली तर चार लोकांना किरकोळ दुखापत झाली असून यांचा जव्हार येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे. गंभीर दुखापत झालेल्याना बाहेर गावी उपचारासाठी हलविण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास मराड यांनी सांगितले. शिल्पा धनजी पढेर, मालिका सुदाम तराळ या दोघींना फ्रॅक्चर झाले असून गंभीर दुखापतमुळे बाहेरगावी हलविले. तर प्रमिला विष्णू बांबरे, साईना सुदाम तराळ, सीता रमेश जंगली, दिता विष्णू बांबरे हे जखमी झाले आहेत.