शालेय बसच्या धडकेत दोन चिमुकल्या बहिणी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 05:28 IST2024-03-02T05:27:43+5:302024-03-02T05:28:06+5:30
सीसीटीव्हीमध्ये अपघाताचा थरार, अमोल नगर येथील घटना

शालेय बसच्या धडकेत दोन चिमुकल्या बहिणी जखमी
मंगेश कराळे
लोकमत न्यूज नेटवर्क,
नालासोपारा :- नायगाव येथे एका खासगी शाळेच्या बसने धडक दिल्याने दोन चिमुकल्या मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर वसईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या अपघाताची सीसीटीव्ही दृश्ये समोर आली आहेत.
नायगावच्या अमोल नगर परिसरात शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. याच परिसरात राहणाऱ्या २ आणि ६ वर्षांच्या दोन सख्या बहिणी पायी जात असताना शाळेच्या बसने धडक दिली. दोन्ही बहिणी बसच्या चाकाखाली आल्या. स्थानिकांनी या मुलींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. बस चालकानेही या कामात मदत केली. यापैकी लहान मुलगी अतिदक्षता रुग्णालयात उपचार घेत आहेत. अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे माणिकपूर पोलिसांनी सांगितले आहे.