शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

सव्वीस हजार शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी; पालघर-ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:08 AM

एकूण १५७ कोटी ४१ लाख रुपये मिळण्याचा अंदाज

सुरेश लोखंडेठाणे : राज्य शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना नुकतीच लागू केली. यामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनाअट माफ केले जात आहे. यासाठी ठाणे व पालघर जिल्ह्यांतील शेतकºयांचा लेखाजोखा काढला जात आहे. त्यानुसार, २५ हजार ८८२ शेतकºयांना १५७ कोटी ४१ लाख पाच हजार ६७७ रुपयांची कर्जमाफी मिळणार असल्याचा अंदाज ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यभरातील शेतकºयांना त्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना राज्यभर लागू केली आहे. त्यास अनुसरून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील टीडीसीसी बँकेच्या ६८ शाखांमध्ये या कर्जदार शेतकºयांचा लेखाजोखा काढला जात आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील ३९६ सहकारी संस्थांद्वारे २५ हजार ८८२ शेतकºयांनी कर्ज घेतले आहे. त्यांच्या या कर्जाच्या खात्यांची तपासणी करण्यासाठी या दोन्ही जिल्ह्यांत ३८ बँक तपासनीस, १७४ सचिव कामाला लागले आहेत. त्यांच्याद्वारे ६८ बँक खात्यांतील कर्जफेडीची मोहीम सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

या दोन्ही जिल्ह्यांमधील २५ हजार ८८२ कर्जदार शेतकºयांनी आतापर्यंत दोन लाखांपर्यंतचे १२८ कोटी १९ लाख ३३ हजार ३७७ रुपये कर्ज घेतल्याचे आढळून येत आहे. या मुद्दल कर्जापोटी आतापर्यंत २९ कोटी २१ लाख ७२ हजार २३० रुपये व्याज झाले आहे. या मुद्दल व व्याजाची रक्कम मिळून या शेतकºयांच्या १५७ कोटी ४१ लाख पाच हजार ६७७ रुपयांच्या कर्जमाफीचा अंदाज टीडीसीसी बँकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. यापैकी ठाणे जिल्ह्यातील १४ हजार ७२५ शेतकºयांचे सर्वाधिक ८९ कोटी ८९ लाख २६ हजार ७६४ रुपये कर्जमाफी होत आहे. पालघर जिल्ह्यातील ११ हजार १५७ शेतकºयांचे ६७ कोटी ५१ लाख ७८ हजार ९१३ रुपये कर्जमाफी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.पालघर जिल्ह्यात ६७ कोटी ५१ लाखांची कर्जमाफीठाण्याप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील ११ हजार १५७ शेतकºयांनी १८९ सहकारी संस्थांद्वारे ३५ टीडीसीसी बँकांतून कर्ज घेतल्याचे आढळून येत आहे. त्यांच्या या व्यवहाराची १७ बँक तपासनीस व संस्थेच्या ८० सचिवांकडून शहानिशा केली जात आहे. या ११ हजार १५७ शेतकºयांनी ५५ कोटी ६७ लाख ६८ हजार ५२५ रुपये कर्ज घेतले आहेत. या मुद्दलीवर ११ कोटी ८४ लाख १० लाख ३८८ रुपये व्याज झालेले आहे. मुद्दलीच्या रकमेसह व्याज मिळून ६७ कोटी ५१ लाख ७८ हजार ९१३ रुपयांची कर्जमाफी पालघर जिल्ह्यातील शेतकºयांना मिळणार आहे. या कर्जदार शेतकºयांचे दोन लाखांपर्यंतच्या कर्जाचे खाते या योजनेमुळे निरंक होण्याची अपेक्षा शेतकºयांकडून केली जात आहे.

टॅग्स :palgharपालघरUddhav Thackerayउद्धव ठाकरे