घातक घनकचरा नेणारा ट्रक पकडला; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 10:59 PM2020-02-26T22:59:44+5:302020-02-26T22:59:46+5:30

शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याऐवजी मुंबईतील धारावी येथे केला रवाना

A truck carrying a deadly solid waste; Filed | घातक घनकचरा नेणारा ट्रक पकडला; गुन्हा दाखल

घातक घनकचरा नेणारा ट्रक पकडला; गुन्हा दाखल

Next

बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील एका रासायनिक कारखान्यातून घातक घनकचऱ्याने भरलेला ट्रक धारावी मुंबई येथे अनधिकृतपणे नेला जात असताना बोईसर पोलिसांनी पकडला असून या ट्रकमध्ये प्रथमदर्शनी घातक स्वरूपातील सहा हजार ४१० किलो घातक घनकचरा असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या संदर्भात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

युनिलेक्स एक्स्पर्ट लि. प्लॉट नं.ई-२ या कंपनीमधील तीन हजार ३३० किलो वजनाच्या घातक घनकचºयाने भरलेल्या प्लास्टिक बॅगा आणि ३०८० किलो वजनाचे केमिकलने माखलेल्या रिकाम्या प्लास्टिक बॅगा हा अती प्रदूषित घनकचरा तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट यांच्याकडे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी न पाठवता मुंबईतील धारावी येथे घेऊन जात होता. त्यावेळी तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कॅम्लीन नाका जिंदाल कंपनीच्या बाजूला बोईसर पोलिसांनी तो ट्रक पकडला.

या पकडलेल्या ट्रकमधून वाहून नेणाºया मालाबाबतच्या अभिप्रायासंदर्भातचे पत्र बोईसर पोलीस ठाण्याकडून म.प्र.नि.मंडळाच्या तारापूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर यांना प्राप्त होताच त्यांनी घनकचरा आणि सदर वाहनचालकाकडील कागदपत्रांची पाहणी केली. गंभीर बाब म्हणजे बोईसर पोलीस ठाण्यात या ट्रकमधील मालाची तपासणी केली असता वर केमिकलने माखलेल्या रिकाम्या प्लास्टिक बॅगा तर त्याखाली घातक घनकचºयाने भरलेली प्लास्टिक बॅग आढळून आली. जेव्हा ट्रक पकडला तेव्हा चालकाकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नव्हती ती नंतर सादर केल्याचे बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले.
म.प्र.नि. मंडळाने मे.युनिलेक्स एक्सपर्ट लि. या उद्योगास दिलेल्या संमतीपत्राप्रमाणे कंपनी हा घातक घनकचरा कोणतीही परवानगी न घेता परस्पर विल्हेवाट लावत असल्याचे या घटनेनंतर समोर आले असले तरी चौकशीअंती आणि नमुने तपासणी अहवालानंतर वास्तव समोर येणार आहे.

या घातक घनकचºयाचे रसायनमिश्रीत प्लास्टिक नमुने हे युनिलेक्स एक्सपर्ट लि. कंपनीचे मॅनेजर संजयकुमार शर्मा (५८) यांच्या समक्ष घेतलेले असून ते सीलबंद करण्यात आले आहेत. त्यातील एक भाग हा रासायनिक तपासणीकरिता पाठविण्याकरिता पोलिसांचे ताब्यात दिले आहे व उर्वरित दोन भाग हे प्रदूषण नियंत्रण मंडळाने ताब्यात घेतले आहेत. घातक घनकचरा वाहून नेण्यासाठी वापरलेला ट्रक बोईसर पोलिसांनी ताब्ब्यात घेतला आहे.

Web Title: A truck carrying a deadly solid waste; Filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.