शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

भूकंपाचे भय अजूनही उरावर, वैज्ञानिकांनी केली घटनास्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 6:20 AM

तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत.

- हुसेन मेमनजव्हार  -  तहसीलदार कार्यालय मार्फत तहसीलदार यांनी फक्त पाहणी करून अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे . मात्र अद्यापही भूगर्भ विभागामार्फत कुठलीही तातडीची उपाय योजना करण्यात आली नसल्याने नागरिक चिंतीत आहेत. भूगर्भ विभागामार्फत आलेल्या अहवालावरून योग्य उपाय योजना करण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु जव्हार भागात वारंवार बसणाºया भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक घरांना तडे गेल्याचे पहावयास मिळत असून गावपाड्यातील अनेक घरातील लोकांनी भीती पोटी घर सोडून माळ रानात व शेतात स्थलांतर केले आहे.जव्हार तालुक्यातील वाळवंडा, चौक, पाथर्डी, कशिवली या भागातील घरांचे बसलेल्या हादर्यांनी छोटेमोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून पंचनामे करण्यात असून येथील ग्रामस्थांनी तंबू ठोकण्यासाठी ताडपत्री मागवून तंबू ठोकून व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे. तसेच या आठवड्यातच सरक्षित तंबू उभरु न देण्यात येतील असे जव्हारचे नायब निवासी तहसीदार सुयोग बेंद्रे यांनी सांगितले.जव्हार वाळवंडा चौक, येथील नागरिकांनी घाबरून जावू नये, तसेच भूकंपाची तीव्रता लक्षात घेता ती आता पर्यंत ३.१ ते ३.२ रिश्टर स्केल पर्यंत मोजण्यात आली असून त्या मानाने कमी असल्याचे सांगून लोकांनी कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये असे आवाहन प्रशासनाचे अधिकारी भूकंपतज्ञ (कुलाबा ) किरण नारखेडे यांनी केले आहे.वाळवंडा गावात याहूनही विदारक चित्र पाहायला मिळत असून भूकंपाच्या भीती पोटी गावातील ग्रामस्थ अक्षरश: शेतात किंवा माळ रानात राहत आहेत. एकीकडे नैसिर्गक आपत्तीची भीती तर दुसरीकडे जंगली प्राण्यासह, साप, विंचूमुळे जीव जाण्याचा भीतीने रात्र काढत आहेत. काहीतरी व्यवस्था होईल या आशेवर ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन वावरत आहे. माळ रानात, शेतात झोपडीत जंगली प्राणी व विषारी प्राण्यांमूळ जीव गेल्यास याला कोण जबाबदार राहील असा प्रश्न उपस्थित होत आहे.तज्ज्ञाकडून भूकंपग्रस्त भागात पाहणी दोन महिने चालणार परीक्षणजव्हार तालुक्यातील शुक्रवारी या भूकंपग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दिल्ली येथून भूकंपमापक यंत्र घेऊन वैज्ञानिकांची टीम दाखल झाली होती. या भूकंप वैज्ञानिकांच्या टीमने शुक्र वारी या परिसराची पाहणी करण्यात आली.तसेच वाळवंडा, चौक या ठिकाणी भूकंपमापक यंत्र बसविण्यात आले आहेत. तसेच या भागात दोन महिने राहून भूकंपाची तीव्रता किती आहे. तेही तपासले जाणार आहे.तसेच, या यंत्राचा आढावा घेवून, दोन महिने भूकंपाची तीव्रता किती आहे. हे सांगितले जाईल असे दिल्ली येथील सिसमोलॉजी वैज्ञानिक मंजितिसंग यांनी सांगितले.

टॅग्स :EarthquakeभूकंपVasai Virarवसई विरार