पोलिसांना मिळाल्या मनासारख्या बदल्या, अधिक्षकांची सहृदयता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:18 IST2019-05-30T23:18:42+5:302019-05-30T23:18:51+5:30
जिल्हा निर्मिती नंतर पोलीस दलात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाच्या साथीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी आज पर्यंत समाधानकारकरित्या केलेले आहे

पोलिसांना मिळाल्या मनासारख्या बदल्या, अधिक्षकांची सहृदयता
पालघर : पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांना दिवसरात्र आपले कर्तव्य बजवावे लागत असल्याने अनेक सण-उत्सव, सुख-दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबा पासून त्यांना दूर राहण्याची वेळ ओढवते. अशावेळी १४२ कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंती च्या ठिकाणी बदली देत त्यांच्या भावनांवर हळुवार पणे फुंकर घालून त्यांच्या व्यथा कमी करण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी केला आहे.
जिल्हा निर्मिती नंतर पोलीस दलात असलेल्या अपुऱ्या मनुष्यबळाच्या साथीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी आज पर्यंत समाधानकारकरित्या केलेले आहे. वाढते नागरिकीकरण आणि त्या अनुषंगाने वाढणाºया गुन्हेगारीला (वसई तालुका वगळता) थोपविण्याचे काम वाढत्या ताणतणावात ही पोलिसा कडून करण्यात आलेले आहे. २८ मे रोजी पालघर पोलिस दलाच्या आस्थापना मंडळाची बैठक पोलीस अधीक्षक गौरव सिंग ह्यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. ह्यावेळी पोलीस दलातील कर्मचारी हे अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतांना त्यांना आपल्या कुटुंबियांना वेळ देता येत नाही. निवडणुका बंदोबस्त, त्या अनुषंगाने येणारे मंत्री, नेते ह्यांचे संरक्षण, सण-उत्सव, आंदोलने-मोर्चे आदी सह गुन्ह्यांचा तपास, गुन्हे रोखणे आदी मोठी जबाबदारी पोलिसांवर पडते. अशावेळी आपले कर्तव्य बजावतांना त्यांना अनेक समस्यांशी सामना करावा लागतो. अशावेळी त्यांच्यावर येणाºया ताण- तणावा पासून दूर करीत त्यांना आपल्या कुटुंबिया सोबत वेळ देता यावा ह्यासाठी पोलीस अधीक्षकांनी त्याच्या पसंती प्रमाणे बदलीचे स्थान अशा नवीन पद्धतीचा अवलंब करुन त्यांना सुखद धक्का दिला आहे. यामुळे जिल्हयातील वर्दीत समाधान निर्माण झाले आहे.
अशी होती बदली प्रक्रीया
तीन पसंतीक्रम घेऊन नालासोपारा, वालीव, विरार, अर्नाळा, पालघर, सातपाटी, डहाणू, घोलवड, मनोर, विक्रमगड, बोईसर, सफाळे आदी १७ पोलीस स्टेशन मधील १४२ बदलीपात्र कर्मचाºयांपैकी ११७ कर्मचाऱ्यांना पसंतीच्या ठिकाणी बदली केली आहे